Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रतीक्षा लवकरच संपणार! जूनच्या 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 14 वा हप्ता

PM Kisan: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत.

या योजनेंतर्गत 13 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आता पुढचा म्हणजेच 14 वा हप्ता लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील हप्ता जूनमध्ये येईल, असे सांगितले जात आहे. तुम्हीही पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर, योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळेल ते येथे जाणून घ्या...

वर्षाला 6 हजारांची मदत मिळते

मोदी सरकारकडून (Government) आर्थिक मदत म्हणून देशातील शेतकरी बांधवांना वर्षभरात 6 हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. यातर्गंत चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातात. आता या योजनेंतर्गत 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हप्त्याची रक्कम जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. मात्र, मोदी सरकारकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही अपडेट किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तसेच, PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा करण्यात आला होता.

या दृष्टिकोनातून, मोदी सरकारकडे पुढील हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत, जून ते जुलै दरम्यान केव्हाही 14 व्या हप्त्याची रक्कम खात्यात वर्ग केली जाऊ शकते.

त्यांना पुढील हप्त्याचा लाभ घेता येणार नाही

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, परंतु आतापर्यंत तुम्ही या योजनेतर्गंत ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करु शकला नाही, तर ते करा, अन्यथा 14 व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात वर्ग केली जाणार नाही. जमीन पडताळणीसाठी तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

SCROLL FOR NEXT