Aadhar Card  Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar Card बाबत मोठी अपडेट, सरकारने दिली 'ही' माहिती; ऐकून तुम्हीही म्हणाल...

UIDAI Aadhaar Card Update: आधार कार्डबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आधारद्वारे ई-केवायसीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Aadhaar Card Latest News: आजच्या काळात आधार कार्ड हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. या कार्डाशिवाय आपण घरापासून बँकेपर्यंत कोणतेही काम करु शकत नाही. आजच्या काळात सर्व कामांसाठी आधार आवश्यक आहे. दरम्यान, आधार कार्डबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आधारद्वारे ई-केवायसीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

ई-केवायसी मध्ये गती

आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आधार वापरुन 84.8 कोटीहून अधिक ई-केवायसी व्यवहार केले गेले. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या (जुलै-सप्टेंबर) तुलनेत हे प्रमाण 18.53 टक्के अधिक आहे. केवळ डिसेंबरमध्ये आधार वापरुन 32.49 कोटी ई-केवायसी व्यवहार केले गेले आहेत, जे मागील महिन्याच्या तुलनेत 13 टक्के अधिक आहे.

सरकारने जाहीर केलेली आकडेवारी

आधार ई-केवायसी सेवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांसाठी पारदर्शक आणि उत्तम ग्राहक अनुभव प्रदान करुन आणि व्यवसाय सुलभ करण्यात मदत करुन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये आधार ई-केवायसी व्यवहारांची संख्या 23.56 कोटी होती. असे व्यवहार नोव्हेंबरमध्ये 28.75 कोटींवर गेले. डिसेंबरमध्ये आणखी वाढ होण्याआधी, अर्थव्यवस्थेत (Economy) त्याचा वाढता वापर आणि उपयोगिता दर्शविते.

पडताळणी आवश्यक नाही

डिसेंबर 2022 अखेर, आधार ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या 1,382.73 कोटी झाली आहे. ई-केवायसी व्यवहार केवळ आधार धारकाच्या स्पष्ट संमतीनंतर केले जातात. त्यानंतर केवायसीसाठी प्रत्यक्ष कागदपत्रे आणि वैयक्तिक पडताळणीची आवश्यकता नाही.

डिजिटल आयडीचा वापर सर्वत्र होत आहे

डिसेंबर 2022 अखेरपर्यंत सुमारे 8,829.66 कोटी आधार व्यवहार झाले आहेत. हे दर्शवते की, आधार आर्थिक समावेशन, कल्याणकारी वितरण आणि इतर अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी कशी वाढती भूमिका बजावत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारद्वारे (Government) चालवल्या जाणार्‍या देशातील 1,100 हून अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रमांना आधार वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात आले आहे. डिजिटल आयडी केंद्र आणि राज्यांमधील विविध मंत्रालये आणि विभागांना कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लक्ष्यित लाभार्थ्यांना कल्याणकारी सेवांचे वितरण सुधारण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Government Employee Transfers: तलाठी, लिपिक, शिपाई आता राज्यभर बदलीसाठी पात्र? सावंत सरकारकडून 'कॉमन केडर' लागू

Voter Registration Rules: पत्ता बदलला, मतदारकी नाही! मग फॉर्म-6 कशाला? उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा आग्रह फेटाळला

Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर सासरच्या सहा जणांना संपवले! बंगळुरूमध्ये कॅबचालकाचा धक्कादायक कारनामा; पोलिसांकडून तपास सुरू

Cristiano Ronaldo Net Worth: फुटबॉलचा कुबेर! रोनाल्डो जगातील सर्वात महागडा ॲथलीट, क्रिकेटचा देव, किंग कोहली कुठेच नाहीत; नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT