Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

Goa Assembly Elections: राज्‍यात विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने शिवसेनेने (शिंदे गट) हालचाली वेगवान केल्या आहेत.
Goa Assembly Elections
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यात विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने शिवसेनेने (शिंदे गट) हालचाली वेगवान केल्या आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावाही आयोजित केला जाणार आहे. गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने तालुकावार समित्या स्थापन केल्या असून, राज्यात तीन ठिकाणी कार्यालये सुरू केली आहेत.

Goa Assembly Elections
Goa Water Crisis: साळावली धरणाशेजारीच पाण्यासाठी वणवण! ग्रामस्थांची व्यथा समोर येताच मानवाधिकार आयोगाची अधिकाऱ्यांना नोटीस

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. या दौऱ्यात शिंदे संघटनात्मक स्थितीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. संपर्क नेते तथा माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे दौऱ्याच्या तयारीची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.