Cristiano Ronaldo Net Worth: फुटबॉलचा कुबेर! रोनाल्डो जगातील सर्वात महागडा ॲथलीट, क्रिकेटचा देव, किंग कोहली कुठेच नाहीत; नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

Cristiano Ronaldo Net Worth: जगाच्या क्रीडा जगतात अशी काही नावे आहेत, जी देश, पिढ्या आणि विक्रमांच्या सर्व सीमा ओलांडून इतिहासाच्या सुवर्ण पानात अजरामर झाली.
Cristiano Ronaldo Net Worth News
Cristiano Ronaldo Net WorthDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cristiano Ronaldo Net Worth: जगाच्या क्रीडा जगतात अशी काही नावे आहेत, जी देश, पिढ्या आणि विक्रमांच्या सर्व सीमा ओलांडून इतिहासाच्या सुवर्ण पानात अजरामर झाली. पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ऊर्फ 'सीआर7' हा त्यापैकीच एक आहे. अप्रतिम फॉर्म, फिटनेस आणि अफाट कमाईच्या जोरावर रोनाल्डो जगातील नंबर-1 खेळाडू आहे.

फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, रोनाल्डोची एकूण संपत्ती तब्बल 11,425 कोटीहून अधिक असून, तो जगातील अवघ्या चार सक्रिय ॲथलीट्सपैकी एक आहे. गेल्या एका वर्षात त्याने 300 मिलियन डॉलर (सुमारे 2858 कोटी रुपये) इतकी थक्क करणारी कमाई केली, ज्यामध्ये सौदी अरबच्या अल-नासर क्लबकडून मिळालेला पगार व बोनस आणि नायकी, अरमानी, कॅस्ट्रॉलसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश आहे.

Cristiano Ronaldo Net Worth News
Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

रोनाल्डोच्या या अद्भुत यशाची सुरुवात 20 ऑगस्ट 2003 रोजी कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका 18 वर्षांच्या तरुण आणि किरकोळ बांध्याच्या मुलाच्या रुपाने झाली. त्यानंतर 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने पोर्तुगालसाठी (Portugal) 234 सामने खेळत आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासात सर्वाधिक 146 गोल करण्याचा आणि 46 असिस्ट देण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. 2006 मध्ये जर्मनीतून आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या रोनाल्डोने 2010, 2014, 2018, 2022 आणि 2026 अशा सलग 6 फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये भाग घेतला. सलग 6 वर्ल्ड कप खेळणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फुटबॉलपटू ठरला.

Cristiano Ronaldo Net Worth News
Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

2026च्या विश्वचषकात उझबेकिस्तानविरुद्ध गोल डागून त्याने हा अनन्यसाधारण विक्रम रचला. जरी 2006 मध्ये पोर्तुगालचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला असला, तरी विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न मात्र त्याच्या कारकिर्दीत अपूर्णच राहिले. असे असले तरी, आधुनिक फुटबॉलवर स्वतःचे वर्चस्व गाजवत मैदानातील कामगिरी आणि आर्थिक यशस्वीतेचे नवे मानदंड स्थापित करणारा रोनाल्डो क्रीडा जगतातील सर्वात मोठा आयकॉन बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.