Bank FD Rates Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank FD Rates: या तीन बॅंका देत आहेत तीन वर्षांच्या एफडीवर बंपर व्याज

Bank FD Rates: बँक एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग समजला जातो. यामध्ये पैसे बुडण्याचा धोका नसतो. यामुळे अनेकांना याचे आकर्षण आहे.

Ashutosh Masgaunde

Bank FD Rates: गेल्या दोन वर्षांत, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे, बँक एफडीवरील व्याजात लक्षणीय वाढ झाली आहे.

देशातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यामागचे मोठे कारण म्हणजे एफडी ही सुरक्षित गुंतवणूक आहे.

FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बॅंका

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ९.१० टक्के व्याज दिले जात आहे. तसेच बँक या कालावधीच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना 8.60 टक्के व्याज देत आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ८.८५ टक्के व्याज दिले जात आहे. सामान्य गुंतवणूकदारांना बँकेकडून या कालावधीतील एफडीवर ८.२५ टक्के व्याज दिले जात आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 8.60 टक्के व्याज दिले जात आहे. दुसरीकडे सामान्य गुंतवणूकदारांना 8.00 टक्के व्याज मिळत आहे.

DCB बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 8.50 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 8.00 टक्के दिले आहे.

इंडसइंड बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या बँक एफडीवर ८ टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते 7.25 टक्के व्याज मिळत आहे.

एसबीएम बँकेच्या वतीने तीन वर्षांच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना ७.३ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.८ टक्के व्याज दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT