Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank: मार्चपर्यंत ही सरकारी बँक होणार खासगी, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती; प्रक्रिया सुरु!

Bank Privatisation Latest News: देशातील बँकिंग प्रणाली सुधारण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

दैनिक गोमन्तक

Bank Privatisation: देशातील बँकिंग प्रणाली सुधारण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सरकार पुन्हा एकदा आणखी एका बँकेचे खाजगीकरण करणार आहे (Bank Privatisation latest News). आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याची विक्री करण्याची प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षात केली जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

सरकारने हिस्सा विकला

आयडीबीआय बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सा विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात संभाव्य गुंतवणूकदारांकडून निविदा मागवल्या होत्या. यासाठी, बिड किंवा एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

6 महिने लागतात

EoI आणि इच्छुक अर्जदारांना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर पात्र बोलीदारांना 'डेटा रुम' मध्ये प्रवेश प्रदान केला जाईल. अधिका-यांनी सांगितले की, 'प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि आर्थिक निविदा प्राप्त करण्यासाठी साधारणतः सहा महिने लागतात. आम्ही मार्चपर्यंत IDBI बँकेसाठी आर्थिक बोली आमंत्रित करण्यास उत्सुक आहोत.'

प्रक्रिया लवकरच संपेल

बँकेच्या धोरणात्मक विक्रीचे हे पहिलेच प्रकरण असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान अनेक प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

भागभांडवल किती आहे?

अर्ज करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदाराकडे किमान 22,500 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तसेच, बिडिंगसाठी पात्र होण्यासाठी, कंपनीला गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये निव्वळ नफ्यात असणे आवश्यक आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) कडे सध्या IDBI बँकेत 529.41 कोटी शेअर्ससह 49.24 टक्के शेअर्स आहेत तर केंद्र सरकारकडे 488.99 कोटी शेअर्ससह 45.48 टक्के शेअर्स आहेत.

LIC आणि सरकारचा एकत्रित हिस्सा किती आहे?

त्याच वेळी, स्टेक विक्रीनंतर बँकेतील एलआयसी आणि सरकारची एकत्रित भागीदारी 94.72 टक्क्यांवरुन 34 टक्क्यांवर येईल. सरकार या बँकेतील आपला 30.48 टक्के आणि एलआयसीचा 30.24 टक्के हिस्सा विकणार आहे. आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) समभाग भांडवलाच्या 60.72 टक्के भागभांडवल या दोघांचे मिळून आहे.

65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य आहे

LIC ने बँकेच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलपैकी 51 टक्के रक्कम ताब्यात घेतल्यानंतर, 21 जानेवारी 2019 पासून रिझर्व्ह बँकेने (RBI) IDBI बँकेचे खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून वर्गीकरण केले होते. विशेष म्हणजे, सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यापैकी 24,544 कोटी रुपये आधीच उभारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT