LIC: आली रे आली LIC ची नवी पॉलिसी आली, लगेच करा गुंतवणूक; जाणून घ्या तपशील

LIC Dhan Sanchay Policy: एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते.
LIC Policy
LIC Policy Dainik Gomantak
Published on
Updated on

LIC Dhan Sanchay Saving Plan Launch: एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी प्लॅन ऑफर करत असते. पुन्हा एकदा भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने 'धनसंचय बचत योजना' नावाची नवीन विमा पॉलिसी लॉन्च केली आहे.

ही योजना 14 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली आहे, म्हणजेच 14 जूनपासून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करु शकता. एलआयसी धनसंचय पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, पॉलिसीच्या कालावधीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल.

एवढेच नाही तर पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर पेआउट कालावधीत हमी उत्पन्न देखील देते.

5 ते 15 वर्षांची योजना

एलआयसीने (LIC) दिलेल्या माहितीनुसार, या पॉलिसीमध्ये, योजनेच्या मॅच्युरिटीच्या तारखेनंतर पेमेंट करताना हमी दिलेले फायदे दिले जातील. याव्यतिरिक्त, गॅरंटीड टर्मिनल फायदे देखील दिले जातील. ही योजना 5 वर्षे ते कमाल 15 वर्षांसाठी आहे. त्यातून निश्चित उत्पन्नाचे फायदे मिळतील. इतकेच नाही तर वाढीव उत्पन्न लाभ, सिंगल प्रीमियम लेव्हल इन्कम बेनिफिट्स आणि सिंगल प्लॅनची ​​सुविधाही यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये लोन लेनची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही रायडर्स देखील खरेदी करु शकता.

LIC Policy
LIC Scheme: LIC च्या या योजनेतून मिळणार थेट 1 कोटींचा फायदा, लगेच जाणून घ्या तपशील

एलआयसीने चार पर्याय सुरु केले

एलआयसीने या प्लॅनमध्ये चार पर्याय लॉन्च केले आहेत. प्लॅन A आणि B अंतर्गत, मृत्यूवर रु. 3,30,000 चे सम अ‍ॅश्युअर्ड कव्हर मिळेल. तसेच, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयांचे किमान विमा संरक्षण आणि प्लॅन डी मध्‍ये मृत्यूवर 22,00,000 रुपयांचे विमा संरक्षण कवच असेल. या योजनांसाठी कमाल प्रीमियम मर्यादा निश्चित केलेली नाही.

पात्रता जाणून घ्या

एलआयसी धन संजय योजनेची पॉलिसी घेण्यासाठी, ग्राहकाचे किमान वय 3 वर्षे, तर पर्याय A आणि पर्याय B साठी 50 वर्षे, पर्याय C साठी 65 वर्षे आणि पर्याय D साठी कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच 3 वर्षे ते 40 वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक (Investment) करु शकतात.

LIC Policy
LIC Policy: मोठी बातमी! मुलीच्या लग्नावर LIC देणार पूर्ण 27 लाख रुपये, जाणून घ्या प्लान?

योजना कुठे खरेदी करायची

तुम्हालाही LIC धन संचय पॉलिसी विकत घ्यायची असेल, तर तुम्ही एजंट/इतर मध्यस्थांमार्फत ऑफलाइन आणि www.licindia.in वेबसाइटला भेट देऊन थेट ऑनलाइन खरेदी करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com