Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Atal Pension Yojana: पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारने 8 वर्षात केले 'हे' काम!

Atal Pension Yojana Update: तुम्हीही अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवले असतील तर मोदी सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Manish Jadhav

Atal Pension Yojana: केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. यातच, तुम्हीही अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवले असतील तर मोदी सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळी देशातील करोडो लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी 28 टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यासह या योजनेला जवळपास 8 वर्षे पूर्ण झाली आहेत.

अर्थमंत्री सीतारामन यांनी ही माहिती दिली

तीन योजनांच्या आकडेवारीचा उल्लेख करुन, सीतारामन यांनी सांगितले की, 26 एप्रिल 2023 पर्यंत PMJJBY अंतर्गत 16.2 कोटी, PMSBY अंतर्गत 34.2 कोटी आणि APY अंतर्गत 5.2 कोटी नावनोंदणी करण्यात आली आहे.

MyGovIndia ने अधिकृत ट्विट केले

MyGovIndia ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, अटल पेन्शन योजना त्यांच्यासाठी आशेचा किरण बनली आहे, ज्यांच्याकडे पूर्वी पेन्शन कव्हरेज नव्हते. देशभरातील गरीब आणि गरजू लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. नागरिक त्यांच्या सुवर्ण वर्षांमध्ये आरामदायी जीवनाची खात्री करत आहेत.

45 टक्क्यांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे

अटल पेन्शन योजनेत अभूतपूर्व वाढ होत आहे. आतापर्यंत सुमारे 5.20 कोटी ग्राहक (Customer) या योजनेत सामील झाले आहेत. यासोबतच या योजनेत 45 टक्क्यांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या कामाच्या वर्षांमध्ये अल्प प्रमाणात योगदान देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करु देते.

या योजनेंतर्गत, वयाच्या 60 वर्षांनंतर, ग्राहकांना मासिक पेन्शन (Pension) 1,000 रुपये ते 5,000 रुपये प्रति महिना अशी हमी दिली जाते. तथापि, पेन्शनची रक्कम या योजनेत जमा केलेल्या रकमेवर अवलंबून असते.=

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

दुसरीकडे, भारतीय नागरिक ज्यांचे वय 18-40 वर्षे आहे ते अटल पेन्शन योजनेत योगदान देण्यास आणि निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यास पात्र आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांनी केवायसी केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT