Atal Pension Yojana बाबत आली आनंदाची बातमी, अर्थमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट!

Atal Pension Yojana Latest Update: तुम्हीही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Finance Minister Of India Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Atal Pension Yojana Latest Update: तुम्हीही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी मोदी सरकारने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना 'अटल पेन्शन योजने'शी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे.

2022-23 या वर्षात सरकारच्या या योजनेत 1.19 कोटीहून अधिक नवीन भागधारक जोडले गेले आहेत, जे वार्षिक आधारावर 20 टक्के वाढ दर्शविते. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली.

योजनेशी संबंधित भागधारकांची संख्या 5.20 कोटींवर पोहोचली आहे.

अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, 2021-22 मध्ये या योजनेशी संबंधित नवीन भागधारकांची संख्या 99 लाख होती. यावेळी 'अटल पेन्शन योजने'मध्ये सहभागी होणाऱ्या भागधारकांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Atal Pension Yojana: विवाहितांना मिळणार मासिक 10000 पेन्शन! लवकरात लवकर घ्या लाभ

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 मार्च 2023 पर्यंत केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित भागधारकांची संख्या 5.20 कोटी झाली आहे.

अटल पेन्शन योजनेंतर्गत, भागधारकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1,000 रुपये ते 5,000 रुपयांपर्यंतची किमान हमी पेन्शन मिळते.

पेन्शनची रक्कम खातेधारकाने केलेल्या वार्षिक गुंतवणुकीवर (Investment) अवलंबून असते. मोदी सरकारने गेल्या वर्षी या योजनेत मोठा बदल केला होता.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुढील महिन्यापासून योजना होऊ शकते बंद!

अटल पेन्शन योजना काय आहे

सध्याच्या नियमानुसार, जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुमचे वय 18-40 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल, तर तुम्ही APY साठी अर्ज करु शकता.

अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक केल्यानंतर वयोमर्यादेनंतर दरमहा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे.

नवीन बदलानुसार, या योजनेत आयटीआर (ITR) भरणारे लोक खाते उघडू शकत नाहीत. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी सुरु करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com