Apple Announces ‘Wonderlust’ iPhone 15 Series Launch Event for 12th September: ऍपलकडू दरवर्षी आयोजित केला जाणारा स्पेशल इव्हेंट यंदा 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.
नेहमीप्रमाणे या वेळी देखील कंपनीने या कार्यक्रमात ऍपलकडून काय काय लॉन्च केले जाईल हे सांगितले नाही, परंतु हे स्पष्ट आहे की, यामध्ये नवीन आयफोन सीरीजमधील iPhone 15 मात्र नक्की लॉन्च होईल.
यावेळी डायनॅमिक आयलँड फिचर आयफोन 15 सीरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये दिले जाणार आहे. जे सध्याच्या आयफोनच्या प्रो मॉडेल्समध्ये दिले गेले आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे बदल पाहायला मिळतील.
या नव्या सीरीजमध्ये अलर्ट स्लाइडरऐवजी बटण दिले जाऊ शकते. याशिवाय, अशीही माहिती समोर आली होती की, आता iPhone 15 सीरीजच्या फोन्सला यूएसबी टाइप सी पोर्ट देऊ शकते.
त्यामुळे आता यूएसबी टाइप सी ला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अँड्रॉइड फोनच्या चार्जरने चार्ज करता येणार आहे.
कंपनीने यावेळीही आयफोन 15 च्या डिझाईनमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही. यावेळी देखील तुम्हाला iPhone 12 पासून असणारी जुनीच डिझाईन पाहायला मिळेल.
गेल्या चार वर्षांत कंपनीने डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. गेल्या वेळी, कंपनीला आयफोन 14 च्या डिझाइनसाठी खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. काही मॉडेल्समध्ये गेल्या वेळी प्रोसेसरही जुनाच देण्यात आला होता.
iPhone 15 मध्ये स्क्रीनच्या आजूबाजूला बेझल्स कमी आणि स्क्रीन एरिया जास्त असेल. रिझोल्यूशन पूर्वीपेक्षा चांगले असेल आणि यावेळी देखील फेस आयडीचा सपोर्ट असेल.
iPhone 15 सीरीजमध्ये नवीन प्रोसेसर आणि नवीन कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये iOS चे नवीन व्हर्जनही दिले जाईल, असे जाणकार सांगत आहेत.
12 सप्टेंबरला जुन्या आयफोनमध्ये iOS चे नवीन व्हर्जन देखील दिले जाऊ शकते. अनेक वेळा कंपनी लॉन्च डेटसोबत दुसऱ्या जुन्या आयफोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करते.
या इव्हेंटमध्ये iPhone 15, iPhone Plus लॉन्च केले जातील. त्यात iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max देखील असतील. कंपनी Apple Watch Series 9 सह SE वेरिएंट देखील सादर करू शकते.
कंपनीने iPhone 15 लॉन्च करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला Apple 'Wonderlust' Event असे नाव दिले आहे.
हा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता सुरू होईल. साधारणपणे हा कार्यक्रम 1 तास चालेल. कंपनीचे सीईओ टिम कुक यादरम्यान नवीन आयफोन लॉन्च करणार आहेत.
या कार्यक्रमाचे कंपनीच्या मुख्यालय Apple Park येथून थेट प्रक्षेपण केले जाईल. Apple च्या वेबसाइट आणि यूट्यूबवर ते थेट पाहता येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.