iPhone 14 वर आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काउंट, असा मिळवा जबरदस्त डीलचा लाभ

कंपनी या फोनच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस देखील देत आहे, त्यानंतर फोनची किंमत 61,000 रुपयांपर्यंत खाली येईल.
Bumper Discount On iPhone 14 on Amazon and Flipkart.
Bumper Discount On iPhone 14 on Amazon and Flipkart.Dainik Gomantak
Published on
Updated on

Bumper Discount On iPhone 14 on Amazon and Flipkart:

Apple या वर्षी सप्टेंबरमध्ये आपला नेक्स्ट-जेन iPhone म्हणजेच iPhone 15 सीरीज लॉन्च करणार आहे. iPhone 15 लाँच होण्याआधी, Apple चा गेल्या वर्षीचा iPhone 14 भारतात मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

Apple ने भारतात iPhone 14 लाँच केला असून 128GB फोनसाठी 79,900 रुपयांच्या बेसिक किमतीत उपलब्ध आहे.

हा फोन आता देशातील विविध ई-रिटेल प्लॅटफॉर्मवर 67,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा आहे की इच्छुक ग्राहक 11,000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळवत iPhone 14 खरेदी करू शकतात.

iPhone 14 वर काय ऑफर आहे

iPhone 14 चा 128GB फोन Amazon India वर 67,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. कंपनी या फोनच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस देखील देत आहे, त्यानंतर फोनची किंमत 61,000 रुपयांपर्यंत खाली येईल.

याव्यतिरिक्त, कंपनी निवडक Amazon Pay, ICICI बँक कार्ड्सवर वेलकम गिफ्ट म्हणून रु. 1,500 सूट देत आहे.

अॅमेझॉन इंडिया फोनच्या 256GB फोनच्या खरेदीवर सूटही देत ​​आहे. हा फोन भारतात 89,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. तो आता Amazon वर Rs 11,901 च्या सवलतीसह Rs 77,999 च्या किमतीत उपलब्ध आहे.

Bumper Discount On iPhone 14 on Amazon and Flipkart.
Success Story: कोट्यावधीच्या कंपन्यांची मालकीन वयाच्या 15 व्या वर्षी होणार रिटायर

फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंट

Flipkart देखील त्याच किंमतींवर आपल्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 14 ऑफर करत आहे. किमतीवर डिस्काउंट व्यतिरिक्त, कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर 4,000 रुपये सूट देत आहे.

तसेच एक्सचेंजवर देखील सवलत देत आहे, त्यानंतर फोनचे 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंट 60,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होतील.

Bumper Discount On iPhone 14 on Amazon and Flipkart.
Success Story: कोट्यावधीच्या कंपन्यांची मालकीन वयाच्या 15 व्या वर्षी होणार रिटायर

Apple iPhone 14 ची वैशिष्ट्ये

  • Apple iPhone 14 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो.

  • फोनच्या स्क्रीनचे रिझोल्यूशन 2532x1170 पिक्सेल आहे आणि ते सिरेमिक शील्ड सिक्युरिटीसह येते.

  • स्मार्टफोन A15 बायोनिक चिपसेटसह 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंटसह येतो.

  • Apple iPhone 14 मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेन्सर आहे. यामध्ये मागील बाजूस 12MP प्राथमिक सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com