Upcoming Phones: टेक मार्केटसाठी सप्टेंबर ठरणार खास, iPhone15 सह हे स्मार्टफोन्स होणार लॉन्च

Apple ने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही, परंतु लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की आयफोन 15 सीरीज टाइप-सी पोर्टसह सादर केली जाईल.
Upcoming Phones in september 2023
Upcoming Phones in september 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Upcoming Phones in september 2023:

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात Oppo A78, Redmi 12 Series, Nokia 130 Music, Nokia 150 आणि OnePlus Ace 2 Pro सारखे फोन लॉन्च झाले आहेत.

Apple सप्टेंबरमध्ये आपली नवीन iPhone 15 मालिका सादर करू शकतो. याशिवाय Honor भारतातही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनी भारतात Honor 90 लॉन्च करू शकते.

iPhone 15 Series

Apple पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरीज लॉन्च करू शकते. आयफोन 15 मालिका यावेळी अनेक बदलांसह रिलीज केली जाऊ शकते.

यावेळी iPhone 15 ची सर्वाधिक चर्चा चार्जिंग आणि Type-C पोर्टची आहे. Apple ने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही, परंतु लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की आयफोन 15 सीरीज टाइप-सी पोर्टसह सादर केली जाईल.

Honor 90

स्मार्टफोन ब्रँड Honor लवकरच भारतात पुनरागमन करणार आहे. कंपनीने याला दुजोरा दिला आहे. Honor भारतात आपला स्मार्टफोन Honor 90 लॉन्च करणार आहे, ज्यासाठी एक पोस्टर देखील जारी करण्यात आले आहे.

Honor 90 बद्दल असे सांगितले जात आहे की हा फोन ग्लोबल स्पेसिफिकेशनसह भारतात सादर केला जाईल. Honor 90 काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेत 6.7-इंचाच्या OLED डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला होता.

Upcoming Phones in september 2023
Artificial Intelligence चा गैरवापर करताय? वाचा, कायदा काय सांगतो

Moto G84 5G

Moto G84 5G भारतात 1 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने फोनचे डिझाइन आणि कलर ऑप्शन्सचा खुलास केला आहे.

कंपनीने डिस्प्ले, प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरीसह मॉडेलच्या अनेक प्रमुख फिचर्सला दुजोरा दिला आहे. हा फोन 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजमध्ये सादर केला जाऊ शकतो. फोनची किंमत 22 हजार ते 24 हजारांच्या दरम्यान असू शकते.

Upcoming Phones in september 2023
Success Story: कर्जबाजारी तरुण सहा वर्षात 55 हजार कोटींचा मालक, यशोगाथा पहिल्या क्रिप्टो अब्जाधीशाची

Samsung Galaxy S23 FE

सॅमसंगचा मिडबजेट फोनही पुढील महिन्यात भारतात लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन ब्लूटूथ SIG डेटाबेसवर दिसला आहे. स्मार्टफोनला 120Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंच डायनॅमिक AMOLED स्क्रीन मिळू शकते. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 किंवा एक्सीनोस 2200 प्रोसेसर असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com