Amit Shah  Dainik Gomantak
अर्थविश्व

Amit Shah: शेअर बाजारातील घसरणीवर अमित शाह स्पष्टच बोलले; 4 जूननंतर....!

Amit Shah On Stock Market: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सातत्याने घसरण नोंदवली जात आहे.

Manish Jadhav

Amit Shah On Stock Market: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. आज (सोमवारी) शेअर बाजारात पुन्हा एकदा (Share Market Crash) मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, तर निफ्टी 200 अंकांनी घसरला. अशा स्थितीत बाजार विस्कळीत होण्यामागे निवडणुकीचा काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आता देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेअर बाजारातील सततच्या घसरणीचा निवडणुकीशी संबंध जोडू नये, असे ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले...

एका मुलाखतीदरम्यान शाह यांनी शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीवर (Amit Shah On Share Market) भाष्य केले. ते म्हणाले की, 4 जून 2024 नंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळेल. मतदानाच्या सातही टप्प्यांनंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर बाजारात सुरु असलेल्या गोंधळामागे सर्व प्रकारच्या अफवांना जबाबदार धरले. शेअर बाजारातील घसरणीला निवडणुकीशी जोडले जाऊ शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

'याआधीही बाजारात 16 वेळा घसरण पाहायला मिळाली होती...'

शाह यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही 16 वेळा शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे, त्यामुळे त्याचा संबंध निवडणुकीशी जोडू नये. ते पुढे म्हणाले की, हे अफवांमुळे घडत आहे, त्यामुळे 4 जूनपूर्वी तुम्ही तुमची खरेदी करा, कारण बाजारात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळणार आहे.

बाजारातील तेजीला अंदाज व्यक्त करत शाह यांनी त्यामागचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा स्थिर सरकार येते तेव्हा बाजारात तेजी पाहायला मिळते. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 च्या पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे. जेव्हा 4 जून रोजी पुन्हा एकदा भाजपचे सरकार येईल तेव्हा शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळेल.

भाजपच्या विजयामुळे बाजारात तेजी पाहायला मिळणार?

PhillipCapital ने बाजार आणि त्याच्या निवडणूक संबंधाबाबत एक नोट जारी केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की ‘’जर भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य साध्य केले तर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल. मात्र, जर एनडीएने 300-330 जागा जिंकल्या आणि त्याचा परिणाम बाजारातील घसरणीच्या रुपात दिसून आला, तर आम्ही ती खरेदीची संधी म्हणून घेऊ.’’

नोटमध्ये पुढे म्हटले की, पहिल्या तीन टप्प्यात मतदान थोडे कमी झाले आहे. याचा काही मतदारसंघातील निकालांवर परिणाम होऊ शकतो, परंतु भाजपच्या सत्तेत परत येण्याच्या व्यापक अपेक्षित निकालावर त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.’’

Mirae Asset Capital Markets ला देखील अपेक्षा आहे की शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल. 2019 चा जाहीरनामा आणि मोदी सरकारने पहिल्या 100 दिवसात केलेले काम यांना जोडले तर अनेक कनेक्शन मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT