शेअर बाजारात आज विक्रमी तेजी दिसत आहे. निफ्टीने आपला पूर्वीचा विक्रम मोडून काढत, 18,604 चा टप्पा पार केला आहे. बाजारात अजूनही अनिश्चितता आहे. महागाई आणि आंतरराष्ट्रीय तणावाव्यतिरिक्त, बाजार संभाव्य मंदीकडे झुकत आहे. काही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदी अपेक्षित आहे. याच कारणास्तव, गुंतवणूकदारांनी सावध राहून केवळ चांगले रिटर्न्स देणाऱ्या शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.
BHEL स्टॉकमध्ये तेजीचा कल आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशांक RSI देखील तेजीत आहे. शेअर लवकरच 90-99 रुपयांची पातळी गाठू शकतो.
BHEL
CMP: 82 रुपये
Buy Range: 80-76 रुपये
Stop loss: 72 रुपये
Upside: 15% – 27%
रेडिंग्टनच्या स्टॉकमध्येही तेजीचा कल आहे. स्टॉक त्याच्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड होत आहे. दैनिक आणि साप्ताहिक निर्देशांक RSI देखील तेजीत आहे. शेअर लवकरच 199-210 रुपयांची पातळी गाठू शकतो.
Redington Ltd
CMP: 177
Buy Range: 177-173
Stop loss: 163
Upside: 14% –20%
अपोलो हॉस्पिटल्सचा शेअर 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड होत आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअरसाठी ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे. या स्टॉकमध्ये लवकरच रु. 5220-5350 ची पातळी दिसू शकते. असे तज्ञांचे मत आहे.
Apollo Hospitals Enterprise
CMP: 4789 रुपये
Buy Range: 4750-4656 रुपये
Stop loss: 4445 रुपये
Upside: 11%-14%
RBL बँकेच्या शेअर देखील तेजीत असून, हा शेअर लवकरच 169-176 रुपयांची पातळी गाठू शकतो.
RBL Bank
CMP: 150
Buy Range: 150-147
Stop loss: 138
Upside: 14%-19%
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.