Mukesh Ambani Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री

काही दिवसांपूर्वीच रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. याच बैठकीत असलेले मुकेश अंबानी यांनी हरित उर्जा क्षेत्रात येण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमन्तक

आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या आता थेट मुकाबला पाहायला मिळणार आहे कारण आता एकाच व्यवसाय क्षेत्रात हे दोघेही समोरासमोर असणार आहेत. अंबानी आणि अदानी यांनी एकमेकांच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णयघेतला आहे विशेष म्हणजे हे दोघेही धनाढ्य व्यक्ती गुजरातमधूनच येतात.

काही दिवसांपूर्वीच रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. याच बैठकीत पेट्रोकेमिकल्सचे राजा असलेले मुकेश अंबानी यांनी हरित उर्जा क्षेत्रात येण्याची घोषणा केली होती. अंबानी या क्षेत्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. देशातील ऊर्जा क्षेत्रात प्रामुख्यानं कोळशाचा वापर होतो. आता अंबानींनी हरित ऊर्जेकडे लक्ष केंद्रीत केल्यानं ऊर्जा क्षेत्रात निर्णायक बदल होतील अशी अपेक्षा आहे. सध्याचा आर्थिक विचार करता रिलायन्सने मागील वर्षात कोरोना महामारीचा काळात सुद्धा 44 अब्ज डॉलर इतके भांडवल जमा केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या या निर्णयाला नक्कीच एक मोठा बदल म्हणून पाहू शकतो कारण यामुळे ऊर्जा क्षेत्रात अनेक गोष्टी नवीन घडतील आणि हा प्रयत्न यशसवीपाने पार ही पडेल.

मात्र दुसरीकडे अदानी आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत आहेत. फ्रान्सची कंपनी टोटल एनर्जीनं अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये एकूण २० टक्के इतका हिस्सा देखील खरेदी केला आहे. कंपनीनं अदानींच्या २५ गिगावॅट सौरऊर्जा पोर्टफोलिओंमध्ये थेट गुंतवणूक केली असून मागील ३ वर्षांत ५० टक्के इतकी वाढी झाली आहे.

तसेच अदानी समूहाची अदानी एंटरप्रायझेस पॉली विनी क्लोराईडउद्योगात उतरणार आहे. यात कंपनी २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.परंतु या क्षेत्रात अंबानींची रिलायन्स आधीपासूनच आहे. अदानी यांनी वर्षाकाठी २ हजार टन क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी ते ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशांमधून कोळसा आयात करणार आहेत.

आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रश्न असा येतो की, हे दोन्ही बलाढ्य उद्योगपती एकमेकांच्या समोर उभा टाकतील का ? आतापर्यंत या दोघांनी अनेक क्षेत्रात आपले नाणे जोरात थकवले आहे. पण आता अंबानी स्वच्छ उर्जा क्षेत्रात येत असल्याने दोघेही एकाच क्षेत्रात समोरा समोर येणार असल्याने नवीन चर्चांना उधाण येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT