Delta Plus Variant म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या का वाढतेय चिंता

अति संसर्गजन्य (Highly infectious ) असलेल्या डेल्टा व्हॅरिएंटचे (Delta variant) रुपांतर अधिक धोकादायक असलेल्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटमध्ये रुपांतर होण्याची भीती आहे.
Delta Plus
Delta PlusDainik Gomantak

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंट पैकी एक असलेल्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या (Delta Plus Variant) महाराष्ट्र (Maharashtra) , केरळ (Kerala) आणि मध्यप्रदेश मध्ये 40 केसेस सापडल्यानंतर चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने (Central Government) या राज्यांना ज्या जिल्ह्यांत हा विषाणु आढळला आहे, त्या जिल्ह्यांत तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी पावल उचलण्यास सांगितले आहे. (What exactly is Delta Plus Variant?)

अति संसर्गजन्य असलेला डेल्टा व्हॅरिएंट हा भारतात सापडल्यानंतर त्याचे रुपांतर अधिक धोकादायक असलेल्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटमध्ये रुपांतर होण्याची भीती आहे. चिंतेची बाब म्हणजे सध्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या Monoclonal antibodies cocktail ला देखील डेल्टा प्लस व्हॅरिएंट प्रतिकार करु शकतो.

Delta Plus
कोरोनाचा Delta Variant सर्वाधिक संक्रमित होणार प्रकार; WHO चा इशारा!

डेल्टा प्लस व्हॅरिएंट बद्दल या महत्वाच्या गोष्टी

डेल्टा प्लस व्हॅरिएंट हा डेल्टा प्लस या व्हॅरिएंटचे म्युटेशन झाल्यामुळे तयार झाला आहे. हा व्हॅरिएंटचे परिणाम नेमके काय होतात याबद्दल अजुन स्पष्टता नाही, मात्र हा अति संसर्गजन्य व्हॅरिएंट आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रास (Tedros Adhanom) यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचं गांभिर्य विषद केले, ''प्रथम भारतामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचे जगभरातील सुमारे 85 देशांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. नागिरकांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबतच या विषाणूला रोखायचं असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये देशांमध्ये कोरोनाच्या लसीचा पुरवठा व्हायला हवा,'' असे डॉ. टेड्रास म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com