Elon Musk and Jeff Bezos Dainik Gomantak
अर्थविश्व

'पार्टी कमी, काम करा' म्हणत एलन मस्कने उडवली जेफ बेझोस यांची खिल्ली

टेस्ला CEO एलन मस्क यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना एक खोचक सल्ला दिला

दैनिक गोमन्तक

आर्थिक जगात सध्या ट्विटरचे नवे मालक एलन मस्क (Elon Musk) यांची खूप चर्चा आहे. त्यांनी केलेलं ट्विट असो किंवा एखादा नविन निर्णय याकडे अर्थविश्वातील सर्वांचं लक्ष लागलं असतं. अशातच एलन मस्क यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना एक खोचक सल्ला दिला आहे. 'बेझोसने पार्टी कमी करावी आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे,' असा खास सल्ला जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' या अंतराळ उपक्रमाच्या पर्यटक उड्डाणाला झालेल्या विलंबाचा समाचार घेताना इलॉन मस्क यांनी दिला आहे. (Elon Musk comment on Jeff Bezos)

अलीकडेच, बेझोसच्या पाचव्या अंतराळ पर्यटक उड्डाण न्यू शेफर्डचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. जेफ बेझोस यांच्या कंपनीचे अंतराळ उड्डाण NS-21 हे सहा जणांना घेऊन या सबर्बिटल स्पेस ट्रिपवर जाणार होते. दरम्यान याबाबत मस्क यांनी बेझोस यांच्या कार्यशैलीवर भाष्य केले आहे. जेव्हा एका वापरकर्त्याने ट्विटरवर मस्कला जेफ बेझोस चांगला माणूस आहे का असे विचारले तेव्हा टेस्लाच्या सीईओंनी बेझोस ठीक ठाक असल्याचे सांगितले.

Tweet

एलन मस्क यांनी बेझोसबद्दल बोलताना हो सल्ला दिला. ते म्हणाले, "मला वाटते की बेझोस बरा आहे, आजकाल तो हॉट टबमध्ये जास्त वेळ घालवत आहे असे दिसते. परंतु जर त्याला कक्षेत जायचे असेल तर त्याने पार्टी कमी आणि काम जास्त करावे."

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 25 मे पर्यंत मस्कची एकूण संपत्ती 193 अब्ज आहे. याचा अर्थ या वर्षाच्या सुरुवातीपासून मस्कच्या संपत्तीत 77.6 अब्जची घट झाली आहे. मात्र, मस्क अजूनही एकूण संपत्तीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस, सध्या 128 अब्ज संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT