अमेरिकेची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतात येण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता कंपनीचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elin Msuk) यांनी देशात प्लांट उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत मौन सोडले आहे. भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी त्यांची काय तयारी आहे आणि त्यांनी आपली पावले का मागे घेतली आहेत, याबद्दल सांगितले. (Elon Musk Tesla Car)
केंद्र सरकार एलन मस्क यांना टेस्लाचा प्लांट भारतात उभारण्यासाठी आमंत्रित करत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, टेस्ला आपली इलेक्ट्रिक वाहने भारतात बनवते, त्यामुळे सरकारला कोणतीही अडचण नाही, परंतु चीनमधून कार आयात करू नये असे सरकारचे म्हणणे आहे.
गडकरींनी टेस्लाच्या सीईओला आमंत्रित केले होते आणि ते म्हणाले की भारतात ई-वाहन क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे, म्हणून मी एलन मस्कला सुचवितो की, त्यांना भारतात चांगली बाजारपेठ मिळेल. चीनमध्ये उपलब्ध असलेले सर्व दर्जेदार विक्रेते आणि ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सही भारताकडे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मस्कला ते भारतात बनवणे आणि भारतात विकणे सोपे जाऊ शकते, असा सल्ला गडकरींनी मस्कला दिला होता.
एलन मस्क यांनी टि्वटरच्या माध्यमातून भारतात इलेक्ट्रिक कार टेस्लाच्या प्रवेशास झालेल्या विलंबाबद्दल आधीच सांगितले आहे. यापूर्वी, अब्जाधीश व्यावसायिकाने भारतातील आयात शुल्कासह इतर समस्यांना तोंड देण्याबद्दल बोलले होते. 16 जानेवारीला केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आपली कार भारतात लॉन्च न करण्याचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की कंपनी सध्या भारत सरकारसोबत अनेक आव्हानांवर काम करत आहे. सरकारसोबत विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी ट्विट केले होते.
भारतात, 40 हजार डॉलर्स किमतीच्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर 100 टक्के कर आकारला जातो, तर यापेक्षा कमी वाहनांवर 60 टक्के कर लावण्याची तरतूद आहे. मात्र मस्कच्या कंपनीने भारतात कार लॉन्च केल्या तरी त्यांच्या किंमती खूप जास्त असतील आणि त्यांची विक्रीही भारतात खूप कमी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.