Akasa Air  Twitter
अर्थविश्व

Akasa Air विमान सेवा सुरू करण्यास सज्ज, DGCA कडून मिळाला परवाना

एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर DGCA ने Akasa Air ला उड्डाण करण्यासाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र दिले

दैनिक गोमन्तक

स्टॉक मार्केटचा बिगबुल असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे समर्थन असलेली अकासा एअर आता उड्डाणासाठी सज्ज आहे. एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर DGCA ने Akasa Air ला उड्डाण करण्यासाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र दिले आहे, त्यानंतर एअरलाइन कंपनी त्यांचे व्यावसायिक उड्डाण ऑपरेशन सुरू करू शकेल. आकासा एअरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

Akasa Air चे पहिले विमान, बोईंग737 मॅक्स मागील महिन्यात दिल्ली विमानतळावर उतरले होते. Akasa Air ला आता व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्यापूर्वी देशातील एअरलाइन्स क्षेत्राचे नियामक DGCA कडून एअर ऑपरेटर परमिट आवश्यक होती. कंपनीची हि प्रतिक्षा आता संपली आहे. अकासा एअरच्या म्हणण्यानुसार, हे विमान 15 जून रोजी अमेरिकेतील सिएटल येथे एअरलाइनला सुपूर्द करण्यात आले होते. अकासा एअरने गेल्या नोव्हेंबरमध्ये बोईंगला ऑर्डर केलेल्या 72 बोइंग 737 MAX विमानांची ही पहिली डिलिव्हरी होती.

आकासा एअरने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी, Akasa Air ने DGCA कडून एअर ऑपरेटर परमिटसाठी अर्ज केला होता, जो एअरलाइन्स क्षेत्राचा नियामक होता. Akasa Air चे Proving Flight अनेक वेळा उड्डाण नियामक DGCA चे समाधान करण्यासाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवले. विमान कंपन्यांचे अधिकारी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवासी म्हणून प्रवास करत होते. यासोबतच ते क्रेबिन क्रू मेंबरही होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

SCROLL FOR NEXT