Air India  Dainik Gomantak
अर्थविश्व

टाटा समूहाचे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी खास 'गिफ्ट'

15 मे पासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन ग्रुप मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

दैनिक गोमन्तक

एअर इंडियाचा ताबा मिळवताच टाटा समूहाने विमान कंपनीचीच्या सुधारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक आघाड्यांवर काम करणारा टाटा समूह आता कर्मचाऱ्यांना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी खास भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Air India to employees to receive gift from Tata group)

एअर इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरच भागीदार बनवू शकते
कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराचा एक भाग म्हणून 'एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स' (ESOPs) चा लाभ मिळू शकतो. यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मालकी हक्काची भावना निर्माण होईल आणि त्यांच्या कामगिरीत देखील सुधारणा होईल, असा विश्वास समूहाला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना कंपनीच्या शेअरच्या किमतीचाही लाभ मिळणार आहे. सध्या, एअर इंडियाच्या प्रतिस्पर्धी कंपन्या इंडिगो आणि स्पाइसजेट त्यांच्या कर्मचाऱ्यांना ESOPs चा लाभ देतात.

एअर इंडिया आधी सरकारच्या मालकीची होती, मात्र टाट समूहाच्या हातात येताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पेन्शन आणि रिटायरमेंट फंडामध्ये ही बदल करण्यात आला आहे.

15 मे पासून नवीन वैद्यकीय विमा
टाटा समूह पुढील महिन्याच्या 15 तारखेपासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठा फायदा देणार आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात म्हटले होते की, 15 मे पासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन ग्रुप मेडिकल इन्शुरन्स (Medical Insurance) पॉलिसीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यामध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. नवीन मेडिकल ग्रुप इन्शुरन्समुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देशभरातील मोठ्या हॉस्पिटल (Hospital) नेटवर्क आणि चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT