देशातील महागाई एवढी वाढलेली नाही : निर्मला सीतारामन

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आणि जागतिक बँकेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये केले भाष्य
Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
Published on
Updated on

Nirmala Sitharaman : देशात महागाईने सामान्यांचे जीवन आणखी खडतर केलं असल्याने सामान्य नागरीकांना दैनंदिन गरजांवर ही नाईलाजास्तव मर्यादा घालाव्या लागत आहेत. असे चित्र देशभर असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई निर्देशांकामधील ही वाढ ‘एवढी वाईट नाही’ असं म्हणत देशातील महागाई वाढलीच नसल्याचं म्हटले आहे. अर्थमंत्री सीतारामन या सध्या वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आणि जागतिक बँकेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. (Inflation in the country has not increased so much Nirmala Sitharaman)

Finance Minister Nirmala Sitharaman
मुंडकारप्रश्नी लोबो गाठणार मामलेदारांची कार्यालयं

देशातील महागाई दर मार्चमध्ये 14.55 टक्के नोंदविला गेला असुन घाऊक महागाई दर चार महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे.यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे मात्र या वाढत्या महागाईच्या निर्देशांकासंदर्भात बोलताना ही वाढ ‘एवढी वाईट नाही’ असं म्हटलंय. त्यामूळे यावरुन विरोधी पक्ष नेमकी काय भुमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

या परिषदेमध्ये बोलताना सितारामन म्हणाल्या कि, जागतिक स्तरावरील आव्हाने समोर आहेत. मग ते कच्च्या तेलाची किंमत असो किंवा काही वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आजच्या तारखेनुसार भारतामधील मागील महिन्यातील महागाईचा निर्देशांक हा 6.9 टक्के होता. मात्र याचा टॉलरन्स बॅण्ड हा केवळ चार टक्के अधिक किंवा दोन टक्के कमी इतका आहे. त्यामुळे यात सहा ट्क्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

Finance Minister Nirmala Sitharaman
Government jobs 2022: CRPF, BSF मध्ये असिस्टंट कमांडंट होण्याची सुवर्ण संधी

यंदा याहून अधिक वाढ झालीय. मात्र ही मर्यादेहून अधिक वाढ तितकीही वाईट नाहीय,” असं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलंय. महागाई वाढल्याने त्याचा भार सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय हे खरं आहे. त्यांच्यावरील हा ताण कमी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या असल्या आव्हानांना तोंड देत आम्ही आता उभे राहून संपूर्ण प्रणालीमधील सुधारणांसह पुढे जाण्यास सक्षम आहोत”, असंही निर्मला यांनी म्हटलंय.

येत्या काही महिन्यांत महागाई दर चढाच राहण्याची शक्यता

प्रामुख्याने अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमतीचे आकडे सांगतात. येत्या काही महिन्यांत महागाई दर चढाच राहण्याची शक्यता दिसून येते. म्हणूनच मागील दोन वर्षे अर्थव्यवस्थेच्या विकासाला पतधोरणाचा प्राधान्यक्रम यापुढे महागाई नियंत्रणाला राहील, अशी भूमिका बदल रिझव्‍‌र्ह बँकेने (Reserve Bank of India) गेल्या पतधोरणात स्पष्ट केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com