Air India recorded loss of 7 thousand cr in one year  Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India ला एका वर्षात 7 हजार कोटी रुपयांच्यावर घाटा

एक वर्षापूर्वी म्हणजेच 2019-20 या आर्थिक वर्षात एअर इंडियाला 7,765.73 कोटी रुपयांचा प्रचंड तोटा झाला होता. (Air India)

दैनिक गोमन्तक

टाटा समूहाला (Tata Group) विकल्या गेलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला (Air India) 2020-21 या आर्थिक वर्षात 7,017.42 रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. तथापि, हे नुकसान वर्षभरापूर्वीच्या तुलनेत थोडे कमी आहे.तुलनेने एक वर्षापूर्वी म्हणजेच 2019-20 या आर्थिक वर्षात एअर इंडियाला 7,765.73 कोटी रुपयांचा प्रचंड तोटा झाला होता. एअर इंडियाने गुरुवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षित आर्थिक निकालांना मंजुरी देण्यात आली.(Air India recorded loss of 7 thousand cr in one year)

एअर इंडियाचे आर्थिक वर्ष 2020-21 मधील नुकसान एक वर्षापूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे कारण कंपनीचा खर्च झपाट्याने खाली आला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एअर इंडियाचा खर्च फक्त 19,083.33 कोटी रुपये होता, तर 2019-20 मध्ये त्याचा खर्च 36,290.17 कोटी रुपये होता.दुसरीकडे एअर इंडियाच्या उत्पन्नातही या काळात मोठी घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एअर इंडियाचे उत्पन्न फक्त 12,104.05 कोटी रुपये होते, तर एक वर्षापूर्वी म्हणजेच 2019-20 आर्थिक वर्षात एअर इंडियाचे उत्पन्न 28,524.44 कोटी रुपये होते.

उल्लेखनीय म्हणजे, सरकारने टाटा समूहाला एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आहे. 8 ऑक्टोबर रोजी डीआयपीएएमचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी जाहीर केले की टाटा समूहाने एअर इंडियासाठी सर्वाधिक 18 हजार कोटी रुपयांची बोली लावून जिंकली आहे. अशाप्रकारे, सुमारे 67 वर्षांनंतर, एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाकडे परत येत आहे. ही विक्री आणि व्यवहार प्रक्रिया डिसेंबर 2021 पर्यंत संपेल.

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली, ज्याचे नंतर टाटा एअरलाइन्स असे नामकरण करण्यात आले. भारतातील प्रसिध्द उद्योजक जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरु केली होती. एप्रिल 1932 मध्ये, टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल नेण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल उड्डाण केले, पुढे ते एअरक्राप्ट मद्रासपर्यंत गेले. ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट नेव्हिल विंटसेंट होते. जे टाटांचे जवळचे मित्रही होते. सुरुवातीला, कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा सुरु केली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद- मुंबई मार्गे चालविण्यात आली. पुढच्या वर्षात, एयरलाइन्सने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT