बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Janhvi Kapoor Achiyyamma: हिंदी चित्रपटसृष्टीला जान्हवी कपूर या चित्रपट झळकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत तिचं एक पोस्टर व्हायरल होत असून प्रेक्षक याला पसंती देत आहेत
janhvi kapoor peddi
janhvi kapoor peddiDainik Gomantak
Published on
Updated on

janhvi kapoor viral look: मेगापॉवर स्टार राम चरण पुढील वर्षी 'पेड्डी' नावाचा मोठा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राम चरणचे मागील दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाहीत, त्यामुळे आता हा स्टार हिरो या स्पोर्ट्स, ॲक्शन आणि ड्रामा असलेल्या चित्रपटातून जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'उप्पेना' फेम बुची बाबू सना करत आहेत. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीला जान्हवी कपूर देखील या चित्रपट झळकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तिचं एक पोस्टर व्हायरल होत असून प्रेक्षक याला पसंती देत आहेत.

जान्हवी कपूरचा 'अचियम्मा' लूक चर्चेत

शनिवारी (दि.१) निर्मात्यांनी अभिनेत्री जान्हवी कपूरचा चित्रपटातील 'अचियम्मा' या भूमिकेतील फर्स्ट लूक दोन वेगवेगळ्या पोस्टर्समधून प्रदर्शित केला. जान्हवी कपूरचा हा लूक अत्यंत लक्षवेधी आणि ग्लॅमरस असून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. या पोस्टरमध्ये जान्हवी कपूर निळ्या रंगाची साडी परिधान करून, जीपवर उभी राहून आत्मविश्वासाने गर्दीला अभिवादन करताना दिसतेय.

janhvi kapoor peddi
Janhavi Kapoor : जान्हवी कपूरला राजकुमार मिळाला होता?...लपुन छपुन भेटी आणि त्याचीच ओढ ;पण अखेर

दुसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवी कपूर माईक स्टँडजवळ आत्मविश्वासाने उभी राहून पोज देताना दिसत आहे. तिची एकूण वेशभूषा गावातील उत्सवाचे वातावरण निर्माण करते. तिच्या पात्राचे वर्णन "तीव्र आणि निर्भीड" असे केले गेलेय, जे या भूमिकेची तीव्रता आणि वेगळेपण अधोरेखित करते.

ऑस्कर विजेते ए.आर. रहमानच्या कॉन्सर्टमध्ये गाणे लॉन्च होणार

'पेड्डी' चित्रपटाच्या फर्स्ट लूक, टीझर आणि वर्किंग स्टिल्समुळे आधीच मोठी चर्चा निर्माण झाली होती. आता या चित्रपटाचे पहिले गाणे (First Song) थेट ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमानच्या हैदराबाद येथील कॉन्सर्टमध्ये लॉन्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरूनच या चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनची भव्यता दिसून येते.

या चित्रपटात राम चरण आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त साऊथचे सुपरस्टार शिवा राजकुमार, ज्येष्ठ अभिनेते जगपती बाबू आणि दिव्येन्दु शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वेंकटा सतीश किलारू यांच्या वृद्धी सिनेमाज निर्मित आणि मैत्री मूव्ही मेकर्स तसेच सुकुमार रायटिंग्ज प्रस्तुत हा बिग-तिकीट चित्रपट २७ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com