World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

IND W vs SA W, World Cup Final Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
World Cup 2025 Final
World Cup 2025 FinalDainik Gomantak
Published on
Updated on

India vs South Africa, Women’s World Cup Final Live Streaming

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा रोमांचक सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार असून, दोन्ही संघ या निर्णायक सामन्यात जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या तयारीत आहेत.

टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाच्या दारात प्रवेश केला आहे. दोन्ही संघांची कामगिरी पाहता हा सामना अत्यंत रोमांचक आणि थरारक ठरणार आहे.

World Cup 2025 Final
Goa Beach Problems: 'किनारी भागात हप्ते हजारांऐवजी द्यावे लागतात लाखांमध्ये'! पालेकरांचा आरोप; 'राजकीय बॉस' शोधण्याची केली मागणी

सामना कधी आणि कुठे पाहाल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. टॉस दुपारी २:३० वाजता होईल. हा सामना तुम्ही भारतातील विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट पाहू शकता, तसेच डीडी स्पोर्ट्सवरही विनामूल्य प्रसारण उपलब्ध असेल.

डिजिटल माध्यमावर सामना पाहू इच्छिणाऱ्यांसाठीही सुवर्णसंधी आहे. तुम्ही JioHotstar अॅप आणि वेबसाइटवरून हा सामना पूर्णपणे मोफत पाहू शकता. कोणत्याही प्रकारचा सबस्क्रिप्शन शुल्क आकारले जाणार नाही.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी, भारताने २००५ आणि २०१७ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. यावेळी, घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडिया विश्वविजेतेपद जिंकून इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.

World Cup 2025 Final
Leopard In Goa: डिचोलीत नेमके किती 'बिबटे' फिरताहेत? 2 पकडून नेले, तिसऱ्याच्या वावराच्या खाणाखुणा; स्थानिक भयभीत

दरम्यान, भारतीय संघातील कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडूंच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण देशाचे डोळे आता या ऐतिहासिक सामन्याकडे लागले असून, महिला टीम इंडिया विश्वविजेतेपद जिंकते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com