Top Indian IT कंपन्या 1 लाखांहून अधिक महाविद्यालयीन पदवीधरांना देणार सुवर्ण संधी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technology) या कंपन्या येत्या आर्थिक वर्षात जवळपास 1 लाख फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत.
This Indian IT companies plan to more than 1 lakhs new opening for fresher's
This Indian IT companies plan to more than 1 lakhs new opening for fresher'sDainik Gomantak

देशात सध्या नोकरभरती वाढत असताना आणि IT सेक्टरमध्येही (IT Sector) वाढ दिसून यात आहे त्यामुळे IT क्षेत्रातही तरुणांसाठी नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध होत आहेत (Job Openings in IT). त्यातच आता भारतातील सर्वात मोठया IT कंपन्या म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technology) या कंपन्या येत्या आर्थिक वर्षात एकत्रितरित्या जवळपास 1 लाख फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत , कंपन्यांनी त्यांच्या संबंधित तिमाही कमाई अपडेटमध्ये देखील ही भरती होईल हे स्प्ष्ट केले होते. (This Indian IT companies plan to more than 1 lakhs new opening for fresher's)

TCS Hiring

आयटी क्षेत्रातील प्रमुख टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने शुक्रवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 35,000 नवीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची त्यांची योजना आहे,आणि ही भरती संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एकूण 78,000 पर्यंत नेतील. कंपनीने गेल्या सहा महिन्यांत 43,000 पदवीधरांना आधीच नियुक्त केले आहे.सप्टेंबरच्या तिमाहीत टीसीएसचे अट्रिशन दर वाढून 11.9% झाले आहे, जे मागील तिमाहीत 8.6% होते. कंपनी व्यवस्थापनही सध्याच्या अट्रिशन पातळीबद्दलही चिंतेत आहे आणि पुढील दोन ते तीन तिमाहीपर्यंत हा कल कायम राहील.

Infosys Hiring

इन्फोसिसने आधीच घोषित केले आहे की कंपनी फ्रेशर्ससाठी त्यांच्या भरती प्रक्रियेचा विस्तार करत आहे कारण अट्रिशनच्या पातळीत तीव्र वाढ झाली आहे. आयटी कंपनीने सांगितले की, 35,000 च्या पूर्वीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात 45,000 महाविद्यालयीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची योजना आहे.

"बाजारातील संधीच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी, आम्ही आमच्या महाविद्यालयीन पदवीधरांच्या नियुक्तीचा कार्यक्रम वर्षासाठी 45,000 पर्यंत वाढवत आहोत," असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले आहे. जून तिमाहीच्या शेवटी, इन्फोसिसने म्हटले होते की 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांना नियुक्त करण्याची योजना आहे.

This Indian IT companies plan to more than 1 lakhs new opening for fresher's
Wipro चे मार्केट कॅप 4 लाख कोटींच्या घरात, बाजारात IT कंपन्या तेजीत

WIPRO, HCL Hiring

त्याचबरोबर विप्रोही या कंपन्यांसारखी मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे यापूर्वीच कंपनीने 8,100 फ्रेशर्सना नौकरी दिली होती. तसेच एचसीएल टेक्नॉलॉजीज या वर्षी सुमारे 20,000-22,000 फ्रेशर्स ग्रॅज्युएट्स घेण्याची योजना आखत आहे आणि पुढील वर्षी 30,000 फ्रेशर्सना ऑनलाईन करण्याचा विचार करत आहे, असे व्यवस्थापनाने गुरुवारी सांगितले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com