Air India  Dainik Gomantak
अर्थविश्व

Air India Vistara Merger: एअर इंडियाला झटका! टाटा समूहाची मोठी योजना अडचणीत, आधी द्यावं लागेल 'हे' उत्तर

Vistara Merger: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाचा करार अडचणीत सापडला आहे.

Manish Jadhav

Vistara Merger: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाचा करार अडचणीत सापडला आहे. कंप्टीशन कमीशन ऑफ इंडिया (CCI) ने एअर इंडियाला नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये एअर इंडियाला विस्तारासोबतच्या विलीनीकरणाची चौकशी का करु नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही विमान कंपन्यांची विलीनीकरणाची योजना रेंगाळू शकते.

एअर इंडियाला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती

मिळालेल्या माहितीनुसार, CCI (CCI) ने एअर इंडियाला बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये विचारले आहे की, विस्तारासोबतच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाची चौकशी का करु नये? यावर उत्तर देण्यासाठी एअर इंडियाला 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाचा कंप्‍टीशनवर किती परिणाम होतो हे सीसीआयला पाहायचे आहे. गेल्या वर्षी, टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सने मार्च 2024 पर्यंत पूर्ण सर्व्हिस कॅरिअर बनण्याची योजना सादर केली होती.

कंप्‍टीशनमध्ये कोणताही बदल होणार नाही

यानंतर दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्तावही सादर केला. त्यावेळी टाटा, सिंगापूर एअरलाइन्स, एअर इंडिया आणि विस्तारा यांच्याकडून एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण झाल्यास कंप्‍टीशनवर कोणताही बदल होणार नाही, असे सांगण्यात आले होते. देशातील फ्लाइट कंप्‍टीशनवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र आता दोन्ही विमान कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावाला मंजूरी देण्याऐवजी आता सीसीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, विस्तारामध्ये टाटा समूहाची 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सची 49 टक्के भागीदारी आहे. विलीनीकरणानंतर, सिंगापूर एअरलाइन्सकडे 25.1 टक्के भागभांडवल असेल, उर्वरित टाटा समूहाकडे असेल. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, सिंगापूर एअरलाइन्सद्वारे $250 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल. कंपनीने सांगितले की, इंटरनल सोर्सकडून फंडिंग केली जाईल. आगामी काळात सर्व विमान कंपन्यांना एकाच छताखाली आणण्याची टाटाची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT