After petrol and diesel, now the price of CNG and PNG has gone up Dainik Gmantak
अर्थविश्व

पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी(CNG), पीएनजीचीच्या(PNG) दरात वाढ

सीएनजीची(CNG) ही दरवाढ आजपासून लागू करण्यात येणार आहे

दैनिक गोमन्तक

देशात पेट्रोल डिझेलच्या(Petrol - Diesel) किमतीचा भडका उडाला असतानाच आता सीएनजीच्या(CNG) दारातही वाढ झाली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 90 पैसे वाढ झाली असून दिल्लीत सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलोवरून वाढून 44.30 रुपये प्रतिकिलो झाली आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएनजी घरगुती किंमती प्रति एससीएममध्ये 26.66 रुपयांवर गेली आहे. तर एनसीआरमध्ये हा दर सीएनजीचे दर 49.08 किलो वरुन 49.98 किलो करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पीएनजीची(PNG) किंमत प्रति एससीएम 29.61 इतका झाला आहे. (Price Hike)

तर पेट्रोलचा विचार करता गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा 35 पैशांची वाढ झाली आहे . यासह डिझेल देखील प्रतिलिटर 9 पैशांनी महागले आहे यामुळे गुरुवारी दिल्लीतील पेट्रोल 100.56 रुपयांवर गेले . तर डिझेलचा दर प्रतिलिटर 89.62 रुपये झाला आहे.

दुसरीकडे याच दरवाढीविरोधात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढीविरोधात आज शेतकरी आंदोलन करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाच्या (एसकेएम) मते, डिझेल, पेट्रोल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तासांच्या दरवाढीविरोधात भारतभर निदर्शने होत आहेत. संघटनेने म्हटले आहे की स्कूटर, मोटारसायकली, ट्रॅक्टर, कार, बस, ट्रक इत्यादींच्या माध्यमातून निषेध स्थळांवर आंदोलक पोहोचतील आणि ते रिकामे गॅस सिलिंडर आपल्यासोबत आणतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

SCROLL FOR NEXT