9 महिन्यांत पहिल्यांदाच GST मध्ये घट

तथापि, केंद्र सरकारच्या म्हण्यानुसार , जूनमधील जीएसटी(GST) महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 2% जास्त आहे.
GST Decrease First time in 9 month
GST Decrease First time in 9 month Dainik Gomntak
Published on
Updated on

9 महिन्यांत प्रथमच देशातील जीएसटी(GST) संकलनाचा आकडा 1 लाख कोटींच्या खाली पोहोचला आहे. जूनमधील जीएसटी संकलन मे मध्ये 1.02 लाख कोटी रुपयांवरून घटून 92,849 कोटी रुपयांवर आला आहे. अर्थ मंत्रालयाने(Finance Ministry) मंगळवारी ही माहिती दिली असून यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संग्रह 95,480 कोटी रुपये इतके होते.

जूनमधील संपूर्ण जीएसटीचा महसूल पाहिला तर त्यात केंद्र सरकारचे(CGST) 16424 कोटी आणि सीजीएसटीचे(SGST) 20,397 कोटी रुपये तर आयजीएसटीचे 49,079 तसेच सेसच्या 6,949 कोटी रुपयांचा समावेश आहे . तथापि, केंद्र सरकारच्या म्हण्यानुसार , जूनमधील जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 2% जास्त आहे.

GST Decrease First time in 9 month
जुलै महिन्यात RBI खरेदी करणार 20 हजार कोटींचे बॉन्ड

जीएसटी संकलनाचा हा आकडा 5 जून ते 5 जुलै दरम्यानचा आहे. या दरम्यान आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 15 दिवसांपर्यंत वाढविण्यासह अनेक कर संबंधित सवलती देण्यात आल्या असून व्याजदरातही कपात केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जूनमधील जीएसटी संग्रह मे दरम्यान झालेल्या व्यवहाराच्या व्यवहाराशी संबंधित आहे. या दरम्यान, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण किंवा आंशिक लॉकडाउन होते. परिणामी, मे मधील ई-वे बिल निर्मितीच्या आकडेवारीत 30% घट झाली. म्हणजेच मे महिन्यात 3.99 कोटी ई-वे बिले तयार करण्यात आली होती, तर एप्रिलमध्ये ती 5.88 कोटी इतकी होती.

GST Decrease First time in 9 month
Domestic Flight: देशांतर्गत प्रवासासाठी विमानसेवेत वाढ

मात्र आता लॉकडाऊन उठल्यानंतर यात मोठा फरक जाणवू शकतो यासह जूनमध्ये 5.5 कोटी ई-वे बिले तयार झाली. हे दर्शविते की व्यापार आणि व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहेत. जर आपण दररोज सरासरी बिल निर्मितीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 20 जूनपासून सुरू होणार्‍या आठवड्यासाठी ई-वे बिलाचा आकडा 20 लाखांच्या पातळीवर पोहोचत आहे. यापूर्वी एप्रिल 2021 च्या पहिल्या दोन आठवड्यात हा आकडा दिसला. तर 9-22 मे दरम्यान दररोज सरासरी 12 लाख ई-वे बिले तयार करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com