पत्रिका वाटल्या, पाहुणे जमले... लग्नाच्या दिवशीच दोन शिक्षिका बहिणींनी संपवलं जीवन, लग्नाचं घर झालं स्मशान; जोधपूरमधील धक्कादायक घटना

Rajasthan Two Sisters Death News: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली, जिथे लग्नाच्या अवघ्या काही तासांआधी दोन सख्ख्या बहिणींनी मृत्यूला कवटाळल्याने खळबळ उडाली.
Rajasthan Two Sisters Death News
Rajasthan Two Sisters Death NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan Two Sisters Death News: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली, जिथे लग्नाच्या अवघ्या काही तासांआधी दोन सख्ख्या बहिणींनी मृत्यूला कवटाळल्याने खळबळ उडाली. जोधपूरमधील दीप सिंह यांच्या 25 वर्षीय शोभा आणि 23 वर्षीय विमला या दोन मुलींच्या लग्नाची घरात लगबग सुरु होती.

संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते, मात्र शनिवारी पहाटे या आनंदाचे रुपांतर अतीव दु:खात झाले. या दोन्ही बहिणी खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरात लग्नाची जय्यत तयारी आणि विधी सुरु होते. सर्व नातेवाईक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत घर गजबजलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास कामं आटपून दोन्ही बहिणी (Sisters) झोपण्यासाठी गेल्या, परंतु शनिवारी पहाटे अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आले.

Rajasthan Two Sisters Death News
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

दोन्ही मुलींची प्रकृती खालावल्याचे पाहताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात दोन्ही बहिणींनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, तरीही मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कुटुंब अंत्यसंस्काराची तयारी करत होते. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाला आता कौटुंबिक वादाचे वळण मिळाले आहे. दोन्ही मुलींचे मामा जसवंत सिंह यांनी या मृत्यूमागे गंभीर कटाची शक्यता वर्तवली असून वडिलांच्या कुटुंबातील सदस्यांना यासाठी जबाबदार धरले आहे.

Rajasthan Two Sisters Death News
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

जसवंत सिंह यांनी आरोप केला की, मुलींचे वडील दीप सिंह यांच्या भावांनी कुटुंबावर प्रचंड दबाव टाकला होता. ज्या ठिकाणी आधीच लग्नाचे प्रस्ताव नाकारले गेले होते किंवा मोडले होते, त्याच ठिकाणी मुलींचे लग्न लावून देण्यासाठी काकांनी जबरदस्ती केली होती. दीप सिंह यांच्या धाकट्या भावाने मुलींवर आणि कुटुंबावर टाकलेल्या याच मानसिक दबावामुळे शोभा आणि विमला यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा मामांनी केला आहे.

Rajasthan Two Sisters Death News
Uttar Pradesh: बाराबंकीत भीषण अपघात, स्कूल बस उलटल्याने 4 मुलांचा जागीच मृत्यू; 25 जणांची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. लग्नमंडप सजलेला असताना आणि सनईचे सूर घुमण्याऐवजी दोन तरुण मुलींचे मृतदेह पाहून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून, लग्नाच्या दबावामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने मुलींनी आपले जीवन संपवले का, याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com