Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची मोठी घसरण, आता 'या' स्थानावर पोहोचले

Manish Jadhav

Adani-Hindenburg Saga News: अदानी समूहासाठी 2023 वर्षाची सुरुवात खूपच वाईट झाली आहे. नुकत्याच आलेल्या हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे.

आजही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होत आहे. गेल्या बुधवारी (01/02/2023) अदानी समूहाने 2000 कोटी रुपयांचा FPO रद्द केला. गुरुवारीही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

यासोबतच, जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी यांचे नावही गायब झाले. त्याचबरोबर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मुकुटही अदानींकडून गेला. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2022 मध्ये अदानी समूहाने आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) प्रचंड फायदा दिला होता, परंतु कंपनीच्या गुंतवणूकदारांनी आता शेअर्स विकण्यास सुरुवात केली आहे.

जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादी

गौतम अदानी (Gautam Adani) जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले असून ते 16व्या स्थानावर आले आहेत. फोर्बच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्समधील ताज्या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $64.7 बिलियनवर आली आहे.

दुसरीकडे, आशियातील अव्वल अब्जाधीशांबद्दल बोलायचे झाल्यास, फक्त गौतम अदानी यांचे स्थान बदलत आहे. अदानींना मागे टाकत आता मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

तसेच, 24 जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या हिंडनबर्ग फर्मच्या अहवालामुळे अदानींना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गच्या अहवालाबाबत खुलासा सादर केला आहे. अदानी कंपनीने हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर, हिंडनबर्गकडून करण्यात आलेले आरोपही अदानी समूहाने फेटाळून लावले आहेत. परंतु अदानी समूहाने दिलेले स्पष्टीकरण काम करताना दिसत नाही. दिवसेंदिवस शेअर्समध्ये घसरणच पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT