Adani Vs Hindenburg: हिंडेनबर्ग रिपोर्ट म्हणजे भारतावरील हल्ला, सर्व आरोप खोटे असल्याचा अदानी ग्रुपचा दावा

राष्ट्रवादाच्या नावाखाली फसवणूक लपवू नका म्हणत हिंडेनबर्ग रीसर्चचे प्रत्युत्तर
Adani vs Hindenburg
Adani vs HindenburgDainik Gomantak
Published on
Updated on

Adani Vs Hindenburg: गौतम अदानी समूहाने हिंडेनबर्ग रीसर्च कंपनीच्या अहवालाला भारतावरील हल्ल्याचे कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे. अदानी समुहाने 413 पानी उत्तर जारी केले आहे.

अदानी ग्रुपवर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे त्यात म्हटले आहे. अमेरिकन कंपन्यांच्या आर्थिक फायद्यासाठी नवीन बाजारपेठ निर्माण करणे हा या अहवालाचा खरा उद्देश असल्याचेही अदानी समुहाने या उत्तरामध्ये म्हटले आहे.

Adani vs Hindenburg
Indian Railway: खुशखबर! रेल्वेच्या वेटिंग तिकीटाचा त्रास संपणार; AI देणार कन्फर्म तिकीट

हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अहवाल जारी केला. यामध्ये अदानी ग्रुपवर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसारखे मोठे आरोप केले होते. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 10 टक्क्यांनी कमी झाली.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये 1.32 लाख कोटी रुपयांची घट झाली. श्रीमंतांच्या यादीत अदानी चौथ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरले. 25 जानेवारीला त्यांची एकूण संपत्ती 9.20 लाख कोटी रुपये होती, जी 27 जानेवारीला 7.88 लाख कोटींवर आली होती.

काय म्हटले आहे अदानी ग्रुपने...

अदानी समूहाने उत्तरात लिहिले आहे की, हा अहवाल एका विशिष्ट कंपनीवर निराधार हल्ला नाही, तर हा भारतावरील नियोजित हल्ला आहे. हा भारतीय संस्थांच्या स्वातंत्र्यावर, अखंडतेवर आणि गुणवत्तेवर घाला आहे.

भारताच्या विकासकथेवर आणि अपेक्षांवर हा हल्ला आहे. अहवाल चुकीची माहिती आणि अर्धवट तथ्यांचे मिश्रण आहे. त्यातील आरोप निराधार असून बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत.

या अहवालाचा एकच उद्देश आहे - खोटे आरोप करून सिक्युरिटीज मार्केटमध्ये एक स्थान निर्माण करणे, असंख्य गुंतवणूकदारांचे नुकसान करणे आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्गला मात्र प्रचंड आर्थिक नफा व्हावा, हाच यामागचा उद्देश आहे.

देशातील सर्वात मोठा अदानी समूहाचा आयपीओ सुरू होण्यापूर्वीच असा अहवाल जारी करून हिंडेनबर्गने वाईट हेतूचा पुरावा दिला आहे. हिंडनबर्गने हा अहवाल लोकांच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी जारी केला आहे.

ते जारी करताना, हिंडेनबर्गने सिक्युरिटीज आणि परकीय चलन कायद्याचेही उल्लंघन केले. हा अहवाल ना स्वतंत्र आहे, ना निःपक्षपाती, ना योग्य संशोधन करून केला आहे.

Adani vs Hindenburg
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर...

हिंडेनबर्ग रीसर्चचे प्रत्युत्तर

अदानी समूहाच्या प्रतिक्रियेवर हिंडेनबर्गनेही उत्तर दिले आहे. हिंडेनबर्गने म्हटले आहे की, "अशा उत्तराने किंवा राष्ट्रवादाच्या नावाखाली फसवणूक झाकली जाऊ शकत नाही. अदानी समूह आमच्या अहवालाला भारतावरील कॅल्क्युलेटेड अटॅक म्हणत आहे. आम्ही याच्याशी सहमत नाही.

भारतीय लोकशाही विविधतेने युक्त आहे. भारत एक उदयोन्मुख महासत्ता आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. अदानी समूहाने भारताचे भवितव्य रोखून धरले आहे. ते देशाच्या झेंड्याखाली स्वतःला लपवत आहेत.

आम्ही आमच्या अहवालात 88 प्रश्न विचारले होते आणि अदानी समूहाने यापैकी 62 प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत. आमच्या संशोधनाला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com