Ecommerce| E-retail Market India Dainik Gomantak
अर्थविश्व

Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांचा भारतीय ग्राहकांवर डोळा, ई-रिटेल मार्केट 2028 पर्यंत ओलांडणार 13 लाख कोटींचा टप्पा

Ashutosh Masgaunde

A recent report predicts that India's e-retail market could cross the Rs 13 lakh crore mark by 2028:

देशातील ई-रिटेल मार्केट हळूहळू मोठे होत आहे. एका ताज्या अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, सन 2028 पर्यंत भारतातील ई-रिटेल मार्केट सुमारे 13 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडू शकेल.

बेन अँड कंपनीने बुधवारी फ्लिपकार्टच्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

या अहवालानुसार, 2023 मध्ये ई-रिटेल मार्केट सुमारे 4.75 लाख कोटी रुपये ते 5 लाख कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे.

काही अहवालांनुसार, 2020 पासून ई-रिटेल मार्केट दरवर्षी सुमारे 8-12 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. असा अंदाज आहे की, भारतात सन 2028 पर्यंत सुमारे 24 कोटी वार्षिक खरेदीदार असतील.

बेनचे भागीदार आणि वरिष्ठ कार्यकारी अर्पण सेठ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, परवडणारा डेटा, उत्तम लॉजिस्टिक, फिनटेक इन्फ्रास्ट्रक्चर आणि मजबूत डिजिटल ग्राहक परिसंस्था यामुळे भारताच्या ई-रिटेल उद्योगाचा दीर्घकालीन आधार खूप मजबूत आहे.

या अहवालात असेही म्हटले आहे की, 2028 पर्यंत 23-25 ​​टक्क्यांच्या वाढीसह बाजार 13 लाख कोटी रुपयांच्या डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतो.

भारतात अनेक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या आपली गुंतवणूक सातत्याने वाढवत आहेत. व्यवसायाच्या प्रचंड शक्यता असल्यामुळे Amazon, Flipkart तसेच रिलायन्स रिटेल सारख्या मोठ्या ऑनलाइन खेळाडू येणाऱ्या काळासाठी मोठी तयारी करत आहेत.

अहवालानुसार, वर्षाच्या सुरुवातीला Amazonने 2030 पर्यंत बाजारात अतिरिक्त $15 अब्ज गुंतवण्याबाबत तयारी केली आहे. यानंतर कंपनीची भारतातील एकूण गुंतवणूक 26 अब्ज डॉलर होत आहे. अलीकडच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा बेसही लक्षणीय वाढला आहे.

एकीकडे भारतील ई-कॉमर्स मार्केट पुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेतील ई-कॉमर्स मार्केटमध्ये मोठी मंदी पहायला मिळत आहे.

नुकतेच ई-कॉमर्स कंपनी Etsy आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्यासाठी आणि खर्च सुव्यवस्थित करण्यासाठी आपल्या 11 टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Etsy मधील सुमारे 225 कर्मचारी सुट्टीच्या हंगामात त्यांच्या नोकऱ्या गमावतील, ज्यामुळे त्याच्या मुख्य बाजारपेठेतील कर्मचार्‍यांची संख्या सुमारे 1,770 होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT