Success Story: भांडवल बुडाले अन् कॅन्टीनमध्ये काम करण्याची वेळ आली, पण जिद्दीच्या जोरावर उभारली 4 हजार कोटींची Balaji Wafers

Balaji Wafers: तिन्ही भावांनी राजकोटमध्ये कृषी उत्पादने आणि कृषी उपकरणांचा एक छोटासा उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी तो फ्लॉप झाला, त्यानंतर त्याने राजकोटमधील ॲस्ट्रॉन सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली.
Balaji Wafers Success Story
Balaji Wafers Success StoryDainik Gomantak
Published on
Updated on

Success Story, Chandubhai Virani set up Balaji Wafers Company worth 4 thousand crores:

जगात असे अनेक किस्से आहेत, ज्यामध्ये साध्या साध्या लोकांनी शून्यातून विश्व निर्माण करत करोडोंच्या संपत्तीचा टप्पा ओलांडला आहे.

यामध्ये असेच एक नाव म्हणजे चंदूभाई विराणी. जे फक्त दहावी पास आहेत आणि त्यांनी या जेमतेम शिक्षणाच्या जोरावर तब्बल 4000 कोटींची कंपनी उभी केली आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कुठलीही नसून “Balaji Wafers” आहे.

बालाजी वेफर्सचे मालक चंदूभाई विराणी यांनी मेहनतीने ही कंपनी स्थापन केली आहे. त्यांचा स्ट्रगल सोपा नव्हता. उदरनिर्वाहासाठी त्यांना कधी टॉकीजच्या कॅन्टीनमध्ये काम करावे लागले तर कधी चित्रपटाची पोस्टर चिकटवावी लागली.

पहिल्याच प्रयत्नात फटका

1974 सालची गोष्ट आहे जेव्हा गुजरातमधील जामनगर येथील एका गावातील तीन भाऊ चंदूभाई विराणी आणि त्यांचे भाऊ भिखूभाई आणि कनुभाई यांना स्थलांतरित होऊन उदरनिर्वाहाच्या शोधात राजकोटला आले. त्याच्या वडिलांनी आपली शेती विकली आणि 20,000 रुपये आपल्या मुलांना गावाबाहेर जाऊन नवीन जीवन सुरू करण्यासाठी दिले.

तिन्ही भावांनी राजकोटमध्ये कृषी उत्पादने आणि कृषी उपकरणांचा एक छोटासा उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी तो फ्लॉप झाला, त्यानंतर त्याने राजकोटमधील ॲस्ट्रॉन सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली.

कॅन्टीनमध्ये काम करण्याची वेळ

पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर कुटुंबातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी काही काळ छोटी-मोठी नोकरी केली. त्यानंतर चंदूबाईंना एका टॉकीमध्ये नोकरी मिळाली, जिथे ते अनेक कामे करत असे.

कधी तो टॉकीजच्या फाटलेल्या खुर्च्या दुरुस्त करायचा तर कधी चित्रपटाची पोस्टर्स चिकटवायचे. त्यानंतर त्यांनी टॉकीजच्या कॅन्टीनमध्ये कामा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे चंदूभाईंची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली, पुढे त्यांनी तेच कॅन्टीन महिन्याला 1000 रुपये भाड्यावर घेतले आणि आपले कॅन्टीन सुरू केले.

Balaji Wafers Success Story
Success Story Of OYO: छोट्याशा खेड्यातील तरुण असा झाला 16 हजार कोटींचा मालक, गोष्ट देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअपची

आणि प्रयोग यशस्वी ठरला

चंदूभाई त्या कॅन्टीनमध्ये काम करत राहिले. कॅन्टीनमध्ये सर्वाधिक मागणी चिप्सला असल्याचे चंदूभाईंनी निरीक्षण केले आणि मध्यंतरादरम्यान बहुतेक लोक चांगल्या चिप्सची मागणी करतात.

त्यानंतर त्यांनी 10,000 रुपये खर्च करून घराच्या अंगणात तात्पुरती शेड बांधली आणि तिथे चिप्सचे विविध प्रयोग करायला सुरुवात केली. जेव्हा ते त्यांच्या घरी बनवलेल्या चिप्स टॉकीजच्या कॅन्टीनमध्ये नेत असे, तेव्हा ते लगेच विकले जाऊ लागले आणि लोकांमध्ये ते लोकप्रिय होऊ लागले.

Balaji Wafers Success Story
Success Story: 3 वर्षे अन् 300 कोटींची कंपनी! भारतीय तरुणाची अमेरिका, जर्मनी, कॅनडा आणि यूके मध्ये करोडोंची कमाई

चार हजार कोटींची उलाढाल

यानंतर 1989 मध्ये चंदूभाईंनी बँकेकडून 50 लाखांचे कर्ज घेऊन राजकोटमध्ये गुजरातमधील सर्वात मोठा बटाटा वेफर कारखाना सुरू केला आणि 1992 मध्ये बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली.

आज या कंपनीत 5 हजार लोक काम करतात आणि देशभरात तिचे 4 कारखाने आहेत. वलसाडमधील बालाजीचा प्लांट आशियातील सर्वात मोठ्या प्लांटपैकी एक आहे. आज या कंपनीची उलाढाल चार हजार कोटी आहे आणि तिचे प्रत्येक उत्पादन लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com