8th Pay Commission Pension Hike 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission Pension Hike 2026: पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग ठरणार वरदान, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शनची जोरदार मागणी; जाणून घ्या

67 Percent Pension Demand 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेमुळे देशभरातील सुमारे 68 लाख पेन्शनर्स आणि 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Manish Jadhav

8th Pay Commission Pension Hike 2026: आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेमुळे देशभरातील सुमारे 68 लाख पेन्शनर्स आणि 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जसा-जसा आठव्या वेतन आयोगाचा विषय पुढे जात आहे, तसतसे पेन्शनधारकांसाठी मोठ्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे. पेन्शनर्स संघटनांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या आणि मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत, ज्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

या वेतन आयोगाचा फायदा घेणाऱ्यांमध्ये पेन्शनर्सची संख्या कर्मचाऱ्यांपेक्षा सुमारे 40 टक्क्यांनी जास्त आहे. यातील बहुतांश पेन्शनर्स जुन्या पेन्शन योजनेच्या अंतर्गत येतात. फिटमेंट फॅक्टर ठरताच यांची बेसिक पेन्शन वाढणार आहे. विविध कर्मचारी व पेन्शनर्स संघटना जसे की, एन.सी.-जे.सी.एम., ए.आय.डी.ई.एफ., आणि बी.पी.एस. यांनी सरकारकडे अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. संघटनांची प्रमुख मागणी आहे की, सध्या मिळणारी पेन्शनची रक्कम वाढवून ती शेवटच्या पगाराच्या 67 टक्के आणि फॅमिली पेन्शन 50 टक्के केली जावी.

याशिवाय, भारत पेंशनर्स समाजने किमान बेसिक पेन्शन थेट 45,000 रुपये करण्याची मागणी केली. तसेच रेल्वे संघटना आणि इतर फेडरेशनने नागरी कर्मचाऱ्यांसाठी 'वन रँक वन पेन्शन' लागू करण्याची आणि पेन्शनला भारताच्या संचित निधीशी जोडण्याची मागणी केली.

सध्याच्या नियमांनुसार जुन्या पेन्शन (Pension) योजनेमध्ये शेवटच्या बेसिक पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते, तर फॅमिली पेन्शन 30 टक्के आहे. उदाहरणार्थ, जर शेवटचा बेसिक पगार 1,00,000 रुपये असेल, तर सध्या 50,000 रुपये पेन्शन मिळते. मात्र संघटनांच्या नव्या मागणीनुसार जर ही रचना बदलली, तर पेन्शनची रक्कम थेट 67,000 रुपयांपर्यंत आणि फॅमिली पेन्शन 50,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. हे सर्व आकडे सध्याच्या संघटनांच्या मागण्यांवर आधारित आहेत.

यावर अंतिम निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच घेतला जाईल. जोपर्यंत सरकार याबाबत अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत सर्व पेन्शनर्सचे डोळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketer Viral Chat: शर्टलेस फोटो अन् खासगी चॅट व्हायरल! टीम इंडियाचा खेळाडू चर्चेत; क्रिकेट विश्वात खळबळ

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

SCROLL FOR NEXT