7th Pay Commission  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission DA Hike: डीए बाबत सरकारने केली मोठी घोषणा, आता मिळणार 50 टक्के महागाई भत्ता!

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढण्यापूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढण्यापूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारा DA 42 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत वाढेल... होय, यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट दरमहा 9000 रुपयांची वाढ होणार आहे. सरकार डीए कधी वाढवणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जुलैमध्ये वाढ होईल

सरकारने (Government) मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार आहे. पुढील वाढ देखील 4 टक्क्यांनी होईल अशी शक्यता आहे.

पगारात बंपर वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यामुळे आगामी काळात पगारवाढ होऊ शकते.

50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर DA शून्य होईल

महागाई भत्त्याचा नियम असा आहे की, जेव्हा सरकारने 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू केला तेव्हा, त्यावेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता. नियमांनुसार, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि 50 टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडले जातील.

पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार आहे

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 50% DA पैकी 9000 रुपये मिळतील. परंतु, DA 50% झाल्यानंतर, तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला थेट पोलीस ठाण्यातून उचलले; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT