Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा लागली लॉटरी! महागाई भत्त्यात बंपर वाढ

DA Hike Alert: उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच 27 लाख कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DA & DR) वाढवल्यानंतर, आणखी एक आनंदाची बातमी येत आहे.

Manish Jadhav

DA Hike Alert: उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच 27 लाख कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DA & DR) वाढवल्यानंतर, आणखी एक आनंदाची बातमी येत आहे.

यापूर्वी केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. आता तामिळनाडू सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यास मंजूरी दिली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांनी वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 16 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

पेन्शनधारकांनाही फायदा होईल

सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की, या पाऊलामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 2,366.82 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

सरकारी कर्मचार्‍यांसोबतच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांनाही सरकारच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून कर्मचाऱ्यांना DA ची वाढीव रक्कम मिळेल.

यापूर्वी, तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के होता, तो आता 42 टक्के झाला आहे. येत्या काही दिवसांत केंद्राने उचललेल्या पावलांनुसार राज्य सरकारही महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

वार्षिक 7536 रुपयांचा फायदा

तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे (Employees) किमान वेतन 15,700 रुपये प्रति महिना आहे. यामध्ये 4 टक्के वाढ मोजली तर कर्मचाऱ्याला 628 ​​रुपये मासिक लाभ मिळेल.

हा लाभ वार्षिक आधारावर 7,536 रुपये असेल. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो. महागाई दराच्या आधारावर डीए किती वाढणार हे ठरवले जाते.

यूपीमध्येही डीएमध्ये 4 टक्के वाढ

याआधी, योगी सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. यासह, यूपीमध्ये डीए आणि डीआर 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे.

यूपीमधील कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2023 पासून वाढीव डीएचा लाभ मिळेल. याशिवाय, केंद्रीय कर्मचारी 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत. सरकारकडून सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये डीए जाहीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT