Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी पगारासह थकबाकीचे पैसे होणार जमा

7th Pay Commission Latest News: केंद्र सरकार व्यतिरिक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्र सरकार व्यतिरिक्त राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट आहे. यावेळी दिवाळीपूर्वी सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता जाहीर केला आहे. जानेवारी 2017 ते मार्च 2017 पर्यंतचा पगार या 5 व्या हप्त्याच्या स्वरुपात दिला जाईल.

थकबाकी 6 हप्त्यांमध्ये दिली जाईल

हा मोठा निर्णय छत्तीसगड (Chhattisgarh) सरकारने घेतला आहे. ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी, छत्तीसगड सरकारने (Government) डिसेंबर 2021 मध्ये चौथा हप्ता भरण्याचे आदेश दिले होते.

वित्त विभागाने दिलेली माहिती

वित्त विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकबाकीचे पैसे मिळतील. हे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या (Employees) खात्यात जमा केले जातील.

महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते

राज्य सरकारने जारी केलेल्या या हप्त्याचा राज्यातील सुमारे 3.80 लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महागाई (Inflation) भत्त्यात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे.

17 ऑक्टोबर रोजी बैठक होऊ शकते

17 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत महागाई भत्त्याव्यतिरिक्त एचआरएबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT