7th Pay Commission Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission:18 महिन्यांच्या DA थकबाकीवर मोठी अपडेट, नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार पैसे!

7th Pay Commission Latest News: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

7th pay commission: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही 18 महिन्यांच्या DA थकबाकीच्या नवीन अपडेटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय परिषदेचे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत चर्चा करण्यात आली आहे.

नोव्हेंबरनंतर होणार चर्चा!

नोव्हेंबर महिन्यात या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चा होऊन लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या डीएची थकबाकी मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. याबाबत सरकारकडून सध्या काहीही सांगण्यात आलेले नाही.

पैसे कर्मचाऱ्यांना दिले जातील

या पत्रात 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत माहिती देण्यात आली आहे. सचिव आणि राष्ट्रीय परिषदेचे सदस्य थकित देयकावर चर्चा करतील. कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची थकबाकी देण्याबाबत चर्चा करता येईल, तसेच देयकही देता येईल. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निर्णयात असेही म्हटले होते की, कोरोना संकटामुळे पेन्शन आणि पगार तात्पुरते थांबवले जात आहेत. जेव्हा देशभरात परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा त्याचे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जातील.

40,000 कोटी सरकारी बचत

त्यासोबतच हा कर्मचाऱ्यांचा (Employees) हक्क असून त्यांना हे पैसे मिळायला हवेत, असे न्यायालयात सांगण्यात आले. डीए आणि डीआर न भरल्याने अशा कर्मचाऱ्यांचे हाल झाले. सरकारी आकडेवारीनुसार, कर्मचाऱ्यांचा 11 टक्के डीए बंद करुन सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली होती.

पंतप्रधान मोदींनी कोणताही निर्णय घेतला नाही

केंद्र सरकारने (Central Government) 18 महिन्यांची थकबाकी भरल्यास त्याचा थेट फायदा देशातील 48 लाख कर्मचारी आणि 64 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांनाही पंतप्रधान मोदींनी विनंती केली होती, मात्र आजपर्यंत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT