PM Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, 4 टक्क्यांच्या DA वाढीला दिली मंजूरी; HRA ही वाढला

7th Pay Commission: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आज (गुरुवारी) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या हा भत्ता 46 टक्के आहे. होळीपूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी खुली केली आहे. सरकारचा नवा निर्णय 1 जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर त्यांचा डीए आता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 जानेवारी 2024 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यांचा पगार मार्च 2024 मध्ये नवीन डीएसह दिला जाईल. सरकारने जानेवारीपासून महागाई भत्त्याच्या वाढीस मान्यता दिली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची थकबाकीही मिळेल.

सामान्यतः महागाई भत्ता वर्षातून दोनदा रिव्हाइज केला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात DA रिव्हाइज केला जातो. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्क्यांवरुन 46 टक्के झाला होता. आता 4 टक्क्यांच्या वाढीसह तो 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा HRA ही वाढला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, ''या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 12,869 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या निर्णयामुळे एचआरएही वाढला आहे. याशिवाय ग्रॅच्युइटीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. ग्रॅच्युइटीची मर्यादा 20 लाखांवरुन 25 लाख रुपये करण्यात आली आहे.'' पीयूष गोयल यांच्या मते, या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये अनेक मोठे फायदे मिळतील.

DA कॅलक्युलेशनचे सूत्र काय आहे?

डीए वाढवल्यानंतर पगार किती वाढेल याचे साधे सूत्र आहे. त्यानुसार पगार काढला जातो. (बेसिक सॅलरी + ग्रेड पे) *DA%. म्हणजेच तुमच्या मूळ पगारात ग्रेड पे जोडल्यानंतर त्याला DA ने गुणा. जो येईल ते तुमचा महागाई भत्ता असेल. या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या. गृहीत धरुया.. तुमचे मूळ वेतन आणि ग्रेड पे जोडल्यानंतर ते रु. 18000 आहे. यानुसार, आतापर्यंत तुम्हाला 46 टक्क्यांनुसार 8280 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता महागाई भत्ता 46 टक्क्यांवरुन 50 टक्के झाला आहे. म्हणजेच डीए 9000 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच डीए वाढल्यामुळे तुमचा पगार दरमहा 720 रुपयांनी वाढेल. जर वार्षिक पगाराबद्दल बोलायचे झाल्यास तर तो 8640 रुपयांनी वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT