7th Pay Commission   Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट! केंद्राची मोठी घोषणा

7th Pay Commission: डीए वाढण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission/HBA Interest Rates: डीए वाढण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. कर्मचार्‍यांना (Central Government Employees) घर बांधण्यासाठी दिले जाणारे बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) व्याज दर 7.9 टक्क्यांवरुन 7.1 टक्के करण्यात आले आहे. यासाठी शासनाने कार्यालयीन निवेदनही जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

या निर्णयाअंतर्गत, सरकारने 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च या कालावधीत घर बांधण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेकडून (Bank) घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी कर्मचार्‍यांना अ‍ॅडव्हान्ससाठी 80 बेसिस पॉइंट्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच 0.8 टक्क्यांनी कपात केली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे (Employees) स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत या व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हाला कोणत्या दराने अ‍ॅडव्हान्स मिळेल हे जाणून घ्या?

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कार्यालयीन निवेदन जारी केले आहे. यामध्ये अ‍ॅडव्हान्स व्याजदरात कपात करण्याबाबत माहिती दिली आहे. सरकारच्या (Government) या घोषणेनंतर, कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत वार्षिक 7.1 टक्के दराने अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात, जे पूर्वी वार्षिक 7.9 टक्के होते. सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता स्वस्तात घरे बांधता येणार आहेत.

मी किती अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतो?

आता प्रश्न असा उरतो की, आपण किती अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतो? सरकारने दिलेल्या या विशेष सुविधेअंतर्गत केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनानुसार 34 महिन्यांपर्यंत किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत दोन प्रकारे अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात. तसेच, घराची किंमत किंवा त्याची देय देण्याची क्षमता, कर्मचाऱ्यांसाठी यापैकी जी रक्कम कमी असेल, ती रक्कम अॅडव्हान्स म्हणून घेतली जाऊ शकते.

HBA म्हणजे काय माहित आहे?

विशेष म्हणजे, केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स देते. यामध्ये कर्मचारी स्वत:च्या किंवा पत्नीच्या नावे असलेल्या भूखंडावर घर बांधण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेऊ शकतो. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्यात आली होती. आता या अंतर्गत, 31 मार्च 2023 पर्यंत, केंद्र सरकार आपल्या कर्मचार्‍यांना 7.1% व्याज दराने घर बांधण्यासाठी अ‍ॅडव्हान्स देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT