Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: खूशखबर, खूशखबर, खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. याअंतर्गत 2022 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरेतर, सोशल मीडियावर एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. अर्थ मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरकडून एक निवेदन जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा निवेदन 20 सप्टेंबर 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात आल्याची माहिती या कार्यालयीन निवेदनात देण्यात आली आहे. या पत्रात पुढे असेही लिहिले आहे की, 1 जुलै 2022 पासून महागाई भत्त्यात वाढ करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.

जाणून घ्या व्हायरल पोस्ट म्हणजे काय?

वित्त मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरच्या या व्हायरल पत्रात पुढे लिहिले आहे की, राष्ट्रपतींना हे कळवण्यास आनंद होत आहे की, 1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्यात आला आहे. परंतु यानंतर पीआयबीने सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या पोस्टची सत्यता तपासली असता ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

PIB तथ्य तपासणी

पीआयबीने आपल्या फॅक्टचेकमध्ये ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या फॅक्टचेकमध्ये सांगितले आहे की, वित्त मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरच्या नावाने व्हायरल होत असलेले हे पत्र पूर्णपणे बनावट आहे. त्यात म्हटले आहे की, 1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई (Inflation) भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT