Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: लाखो कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले! सरकारने पुन्हा केली डीएमध्ये वाढ

DA Hike News: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेटवस्तू मिळू लागल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेटवस्तू मिळू लागल्या आहेत. देशातील लाखो कर्मचाऱ्यांना या महिन्यात अधिक पगार मिळणार आहे. केंद्रानंतर छत्तीसगड सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 5 टक्के वाढ केली आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे.

ऑगस्टमध्येही वाढ झाली होती

याआधी राज्य सरकारने ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती आणि आता दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा सरकारने (Government) डीए (DA) वाढवण्याची घोषणा केली आहे.

वित्त विभागाने दिलेली माहिती

छत्तीसगड सरकारने दिवाळीपूर्वीच महागाई (Inflation) भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना (Employees) 28 टक्क्यांऐवजी 33 टक्के डीए मिळेल. महागाई भत्त्यात वाढ झाल्याची माहिती वित्त विभागाने दिली आहे. याबाबतची माहिती वित्त विभागाने अधिसूचना जारी करुन दिली आहे.

28 ते 33 टक्क्यांपर्यंत वाढेल

आता राज्यात सातव्या वेतनश्रेणीतील 33 टक्के आणि सहाव्या वेतनश्रेणीत 201 टक्के डीए मिळणार आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांचा डीए 22 टक्क्यांवरुन 28 टक्के करण्यात आला होता.

1 ऑक्टोबरपासून पगार वाढणार आहे

डीएचा वाढलेला दर ऑक्टोबरपासून लागू होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना 1 ऑक्टोबर 2022 पासून वाढलेला पगार मिळेल. ऑगस्ट महिन्याच्या पगारासह मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढीचा हा आदेश UGC, AICTE आणि आकस्मिक वेतन कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात 'दरोड्याचे भय' दिवसेंदिवस! 'भिवपाची कांयच गरज ना' म्हणणाऱ्या CM प्रमोद सावंतांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह

अग्रलेख; पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी: काँग्रेस पक्षात मोठे विभाजन होणार? राहुल गांधींच्या नेतृत्त्वाची अग्निपरीक्षा!

'हात लावेन तेथे सोने' करण्याची धमक दाखवलेल्या 'भाजप'ला हरवण्यासाठी विरोधकांना 'एकी'चा मंत्र हवा! - संपादकीय

Goa Politics: खरी कुजबुज; 'नंतर' सुदिन काय बोलणार?

Terrorists Attack in Pakistan: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 'पॅरा मिलिट्री फोर्सेस'च्या मुख्यालयात घुसून गोळीबार, तीन सैनिक ठार Watch Video

SCROLL FOR NEXT