7th Pay Commission Dearness allowance for central employees will be increased soon   Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच होणार वाढ

एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी असून. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ लवकरच जाहीर केली जाऊ शकते. यासोबतच त्यांच्या 18 महिन्यांच्या थकबाकी डीएवरही मोठी घोषणा केली जाऊ शकते. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 लाख रुपये येऊ शकतात. याचा फायदा एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. (7th Pay Commission Dearness allowance for central employees will be increased soon)

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत 18 महिन्यांपासून डीए (DA) दिलेला नाही. अनेक दिवसांपासून कर्मचारी त्याची देणी देण्याची मागणी करत आहेत. हाती आलेल्या अहवलानुसार, सरकार याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते. तसेच यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकवेळचा महागाई भत्ता दिला जाऊ शकतो.

2 लाखांपर्यंतचा फायदा होईल

मोदी PM Modi सरकारने कर्मचाऱ्यांना थकबाकी भत्ते देण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत फायदा होण्याची अपेक्षा आहे.

महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो

जानेवारी ते जुलै दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा अपडेट केला जातो. DA ची गणना सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनासह गुणाकार करून केली जाते. सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. कर्मचार्‍यांना त्यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी ते दिले जाते. यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. असे झाल्यास, आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर महागाई भत्ता 6,120 रुपये होईल. त्याचप्रमाणे कमाल वेतन स्लॅब असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए वाढून 19346 रुपये प्रति महिना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT