व्ही अनंत नागेश्वर बनले भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

व्ही अनंत नागेश्वर (V Anant Nageshwar) यांची भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.
V Anant Nageshwar
V Anant Nageshwar Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने (Central Government) व्ही अनंत नागेश्वर यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. केव्ही सुब्रमण्यम यांचा डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. तेव्हापासून या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. कोरोना महामारीनंतरही भारताची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली नाही. मात्र, सध्या भारतासमोर बेरोजगारी ही मोठी समस्या बनत आहे. अशा परिस्थितीत यावर मात करण्यासाठी भारत सरकारवर मोठा दबाव आहे. अशा वेळी, नवीन मुख्य आर्थिक सल्लागाराकडून गुंतवणूक पुनरुज्जीवित करताना आणि अर्थसंकल्पातील तफावत भरुन काढताना उच्च वाढीसाठी एक प्रिस्क्रिप्शन देणे अपेक्षित आहे. (V Anant Nageshwar became India's Chief Economic Adviser)

दरम्यान, डॉ. व्ही अनंत नागेश्वरन हे आंध्र प्रदेशातील क्रिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. त्यांचा आर्थिक क्षेत्रात गाढा अभ्यास आहे. डॉ नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून 1985 मध्ये एमबीए केले. विनिमय दरांच्या अनुभवजन्य वर्तनावर केलेल्या कामासाठी त्यांना मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाकडून आर्थिक विषयात डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

V Anant Nageshwar
Post Office 'या' योजनेत दररोज करा 70 रुपये जमा आणि मिळवा भरगोस पैसे

शिवाय, डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांनी सिंगापूरस्थित बँक ज्युलियस बेअर अँड कंपनीचे जागतिक मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर डॉ व्ही अनंत नागेश्वरन ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2019 पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आहेत. त्यानंतर 2021 पर्यंत त्यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार

अर्थसंकल्पापूर्वी, डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा स्थितीत यावेळचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना कसा दिलासा देतो, हे पाहावे लागणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com