7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांची वाढ; आता पगार...

DA Hike News: राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% ने वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest News: उत्तराखंडमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% ने वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे 3 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. आतापर्यंत उत्तराखंड सरकारच्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मात्र 4% वाढीनंतर आता त्यांचा DA 42% झाला आहे.

वार्षिक महागाई भत्ता एकूण 90,720 रुपये असेल.

डीए वाढीसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए वाढ मंजूर करण्यात आली आहे.

नवीन बदलानंतर, आता 18,000 रुपयांच्या मूळ वेतनावर एकूण डीए 90,720 रुपये वार्षिक असेल. सध्या, 38 टक्के डीएच्या आधारावर, 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 6,840 रुपये महागाई भत्ता मिळतो.

महागाई भत्ता 7,560 रुपये झाला

त्यात आता 4 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 7,560 रुपये झाला आहे. जर कर्मचार्‍याचे मूळ वेतन 18,000 रुपये प्रति महिना असेल, तर त्यानुसार, 18000 x 42/100 म्हणजेच 7560 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळेल.

सरकारने वाढवलेला महागाई भत्ता 1 जानेवारीपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच वाढीव पगारासह कर्मचाऱ्यांना (Employees) आणि पेन्शनधारकांना 5 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.

महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारीपासूनचा थकीत डीए मार्चमध्ये जाहीर करण्यात आला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. याबाबत, सरकारकडून (Government) सप्टेंबरमध्ये घोषणा केली जाऊ शकते. यावेळीही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास डीए 42 टक्क्यांवरुन 46 टक्के होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT