7th Pay Commission
7th Pay Commission   Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: खात्यात किती पैसे वाढणार? कर्मचार्‍यांच्या DA चे संपूर्ण गणित घ्या समजून

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Calculation: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत जुलै 2022 साठी डीए (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. सध्याच्या 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख निवृत्ती वेतनधारकांना सरकारने 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ दिली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या 34 टक्क्यांवरुन 38 टक्के झाला आहे.

महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो

जुलै 2022 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होणार आहे. म्हणजेच जुलैपासून कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै-ऑगस्टची थकबाकीही मिळणार आहे. केंद्राकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Increase) वर्षातून दोनदा वाढ केली जाते. प्रथम वार्षिक आधारावर जानेवारी आणि जुलै पासून अंमलात येईल. मार्च आणि सप्टेंबरच्या शेवटीच त्याची घोषणा केली जाते.

परंतु या सगळ्यात, कर्मचाऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरच्या पगाराच्या रुपात किती अतिरिक्त रुपये येतील याचा हिशेब तुम्ही करु शकत नसाल तर आम्ही तुम्हाला यात मदत करतो.

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900

2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना

4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640

पगार किती वाढणार

यानुसार, कमाल मूळ वेतन 56,900 रुपये असलेल्यांच्या पगारात दरमहा 2260 रुपयांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे, किमान मूळ वेतन 18,000 रुपये असलेल्यांच्या वेतनात मासिक आधारावर 720 रुपयांचा फरक असेल. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना सप्टेंबरचा वाढलेला पगार आणि दोन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. म्हणजेच, ऑगस्टच्या तुलनेत जास्तीत जास्त मूळ वेतन असलेल्यांच्या खात्यात 6780 रुपये जादा येतील. त्याच वेळी, ही रक्कम किमान मूळ वेतनावर 2160 रुपये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT