7th Pay Commission | Money
7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA वाढीसह महिलांनाही मोठी भेट

Manish Jadhav

DA Hike in Himachal Pradesh: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने सध्याच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंदाची बातमी दिली आहे.

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बहाल करण्यासोबतच महागाई भत्त्यात (DA Hike) करण्याची घोषणा केली आहे.

सरकारने डीए वाढवण्याच्या घोषणेचा फायदा 2.15 लाख कर्मचारी आणि 1.90 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

हिमाचल सरकारकडून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 31 टक्क्यांऐवजी आता 34 टक्के डीए मिळेल.

500 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 3% डीए वाढीमुळे हिमाचल प्रदेश सरकारच्या (Government) तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल.

याशिवाय सीएम सुखविंदर सिंग सुक्खू यांनी जून 2023 पासून स्पितीच्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 9,000 महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली.

सरकारकडून DA आणि DR वर्षातून दोनदा वाढवले ​​जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते.

1.36 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे

दुसरीकडे, हिमाचल सरकारने 1 एप्रिल 2023 पासून जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

याचा फायदा राज्य सरकारच्या 1.36 लाख कर्मचाऱ्यांना (Employees) होणार आहे. या कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) अंतर्गत कपातीचा सामना करावा लागणार नाही.

राज्याच्या मुख्य सचिवांनी ओपीएस लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुनी पेन्शन (OPS) बहाल करण्याचे आश्वासन दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : गोव्‍यात ‘इंडिया’चे सरकार आणू : आमदार वेन्झी व्‍हिएगस

Lairai Devi Jatra 2024 : लईराईदेवी जत्रा : लाखोंची उलाढाल दृष्टीपथात

Cashew Farmer : काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण बनविणार; दिव्या राणे यांची घोषणा

Postal Voting : टपाली मतदान ठरणार निर्णायक; अटीतटीच्या लढतीमुळे दक्षिण गोव्यात भाजपला होणार साह्यभूत

Smoking With Tea: चहासोबत सिगारेट पिणाऱ्या लोकांसाठी धोक्याची घंटा, कर्करोगाचा वाढता धोका

SCROLL FOR NEXT