7th Pay Commission 2.30 lakh salary hike for central employees

 
Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 2.30 लाखांची वाढ!

जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे.नवीन वर्षात पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ होऊ शकते

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी येणार आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे. वास्तविक, नवीन वर्षात पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे (Government Employees) पगार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता (DA Hike) किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे.

AICPI डेटाद्वारे ठरवला जाईल DA

तज्ञांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्ता 3% ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे. जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.

जुलै 2021 पासून DA कॅल्क्युलेशन

महिना संख्या DA टक्केवारी

जुलै 2021 353 31.81%

ऑगस्ट 2021 354 32.33%

सप्टेंबर 2021 355 32.81%

ऑक्टोबर 2021 - -

नोव्हेंबर 2021 - -

डिसेंबर 2021 --

DA गुणांची गणना

जुलै कॅलक्युलेशन- 122.8X 2.88 = 353.664

ऑगस्ट कॅलक्युलेशन- 123X 2.88 = 354.24

सप्टेंबर कॅलक्युलेशन- 123.3X 2.88 = 355.104

DA 3 टक्क्यांनी वाढणार

जर आपण AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सप्टेंबर 2021 पर्यंत, महागाई भत्ता 33 टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यात आणखी 1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत CPI (IW) चा आकडा 125 पर्यंत राहिला, तर महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ निश्चित आहे. म्हणजेच एकूण DA 3% ते 34% वाढेल. जानेवारी 2022 पासून ते दिले जाणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

34% DA वर गणना

महागाई भत्ता 3% ने वाढवल्यानंतर एकूण DA 34% होईल. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 6,480 रुपये वाढ होणार आहे.

किमान मूळ वेतनावरील गणना

1. कर्मचार्‍यांचा मूळ पगार रु 18,000

2. नवीन महागाई भत्ता (34%) रु 6120/महिना

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु 5580/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = रु. 540/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 540X12 = रु. 6,480

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT