RBI लाँच करणार डिजिटल करन्सी, अर्थमंत्रालयाची मंजुरी?

भारतीय रिझर्व्ह बँक दोन टप्प्यात CBDC म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल चलन सुरू करण्याची योजना आखत आहे
RBI plan to launch RBI Digital Currency CBDC

RBI plan to launch RBI Digital Currency CBDC

Dainik Gomantak

Published on
Updated on

क्रिप्टोकरन्सीमधील (Cryptocurrency) गुंतवणुकीबाबत देशात वाद सुरू आहेत. सरकार संसदेच्या (Parliament) चालू अधिवेशनात (Winter Session) त्याच्या नियमनासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.मात्र दुसरीकडे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) म्हणजेच आरबीआय लवकरच आपले डिजिटल चलन आणणार आहे. त्याचे नाव CBDC म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (RBI digital Currency) असेल अशी माहिती समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक दोन टप्प्यात CBDC म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल चलन सुरू करण्याची योजना आखत आहे.एका बिजनेस वृत्तपत्राच्या माहितीनुसार सीबीडीसी बेस्ट होलसेल खात्यासाठी प्रायोगिक चाचणी लवकरच सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक डिजिटल करन्सी लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे.(RBI plan to launch RBI Digital Currency CBDC)

अहवालानुसार, रिझर्व्ह बँकचे इनोव्हेशन हब बंगलोर या डिजिटल चलनावर काम करत आहे. आणि हे चलन दोन टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. सर्वप्रथम, रिझर्व्ह बँक घाऊक आधारित सीबीडीसी सुरू करणार आहे, जे जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता ते पायलट चाचणीसाठी जाईल. यासाठी रिझर्व्ह बँक दुसऱ्या एजन्सीला सहभागी करून घेऊ शकते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. सध्या CCIL विचाराधीन आहे.मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.सीसीआयएलने आरबीआयच्‍या बॉन्‍डसाठी रिटेल डायरेक्ट स्‍कीमसाठीही तांत्रिक सहाय्य दिले होते. सीसीआयएलचाही येथे समावेश करावा, अशी चर्चा या संदर्भात सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>RBI plan to launch RBI Digital Currency CBDC</p></div>
Aadhaar चा मोदी सरकारला 2 लाख कोटी रुपयांचा 'आर्थिक आधार'

याशिवाय, भारतीय रिझर्व्ह बँक अजूनही सरकारच्या अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे, ज्या अंतर्गत बँकिंग नियमन कायद्यांतर्गत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ची व्याख्या म्हणून या चलनाचा समावेश करू शकतो.त्यामुळे आता या दुरुस्त्या किती लवकर होतात हे पाहावे लागेल. आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचे पहिले उत्पादन म्हणजे CBDC, घाऊक आधारित उत्पादन, ते कधी बाजारात येते.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, अर्थ मंत्रालयाने सांगितले होते की सरकार सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा CBDC वर विचार करत आहे. हे कोणत्याही क्रिप्टोकरन्सीसारखे नसेल, त्याचे स्वरूप पैसे किंवा पैशासारखे नसेल, परंतु ते पूर्णपणे डिजिटल असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com