Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत पैसे!

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा धक्का दिला आहे. तुम्हीही 18 महिन्यांच्या DA थकबाकीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा धक्का दिला आहे. तुम्हीही 18 महिन्यांच्या DA थकबाकीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सरकारने राज्यसभेत सांगितले की, 'कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपासून त्यांचे प्रलंबित डीए थकबाकीचे पैसे मिळणार नाहीत.'

पैसे मिळणार नाहीत

माहिती देताना सरकारने म्हटले की, 'कर्मचाऱ्यांना तीन हप्त्यांचे पैसे दिले जाणार नाहीत.' सध्या तरी शासनाकडून तशी तरतूद नाही. हे डीए थकबाकीचे पैसे महामारीच्या काळापासूनचे आहेत, कोराना काळात सरकारने पेन्शनधारकांचे डीए थकबाकी आणि डीआर बंद केले होते.

कर्मचारी संघटना नाराज आहेत

सरकारच्या या प्रतिक्रियेने कर्मचारी संघटना अजिबात खूश नसून हे पैसे थांबवता येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोना काळात डीए न वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी (Employees) काम केले आहे. या कालावधीत महागाई भत्ता न दिल्याने सरकारने सुमारे 34,000 कोटी रुपयांची बचत केली आहे.

नवीन वर्षात डीएमध्ये पुन्हा वाढ होणार आहे

केंद्र सरकारने (Central Government) 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीतील 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे अद्याप दिलेले नाहीत आणि आता हे पैसे देण्यास सरकारने नकार दिला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीए मिळत असून लवकरच जानेवारी महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात डीएमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

SCROLL FOR NEXT